Russia-US आमनेसामने; काळ्या समुद्रात अमेरिकेच्या ड्रोनला रशियाच्या एयक्राफ्टने...

Russia-US: एमक्यू-9 रीपर ड्रोनचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी केला जातो.
US Drone
US DroneDainik Gomantak

Russia-US: रशिया आणि अमेरिका या दोन देशात नेहमीच स्पर्धा आणि तणाव दिसून येतो. युक्रेन रशिया युद्धावरुन या दोन देशात तणाव निर्माण झाला आहे. आता त्यात भर पडली असून नव्या वादाने तोंड वर काढले आहे.

अमेरिकेच्या ड्रोनला रशियाने काळ्या समुद्रात ( Black Sea ) नष्ट केले आहे. हा काळा समुद्र रशिया, तुर्की, बुल्गेरिया, जॉर्जिया आणि रोमानिया या देशांबरोबर देखील सीमा बनवतो. रशियाच्या सुखोई-एसयू 27 (Sukhoi Su-27) ने अमेरिकेच्या एमक्यू-9 रीपर ड्रोन (MQ-9 Reaper) ला समुद्रात पाडले आहे.

एमक्यू-9 रीपर ड्रोनचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी केला जातो. अमेरिकेची डिफेंस कंपनी जनरल एटॉमिक्स एयरोनॉटिकल सिस्टम्स (General Atomics) ने या ड्रोनची निर्मिती केली आहे. हे ड्रोन मानवविरहित एअर व्हेइकल आहे. लांब पल्ल्याच्या प्रदेशात हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेची वायूसेना या ड्रोनचा वापर करते.

रशियाने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेच्या वरिष्ठ सैन्य अधिकारी जनरल जेम्स बी. हेकरने प्रितिक्रिया दिली आहे.

आमचे MQ-9 ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई सीमेतून उडत होते. रशिया( Russia )ने केलेल्या या हल्ल्यात MQ-9 ड्रोन मोठे नुकसान पोहचल्याने त्याला समुद्रात पाडावे लागले असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या आरोपांच्या खंडन करत रशियाने आपली बाजू मांडली आहे.

US Drone
LGBTQ: समलैगिंक जोडप्यांच्या मुलांची जन्मनोंदणी बंद करा; 'या' देशाने जारी केला आदेश

समुद्रात पडण्यापूर्वी अमेरिकेचे ड्रोन अनियंत्रितपणे उडत होते असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आता अमेरिका( USA )-रशियातील हा वाद इथेच थांबणार की याला मोठे स्वरुप प्राप्त होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com