अमेरिकेनंतर रशियाची 'ओपन स्काय करारातून' माघार; जाणून घ्या कारण

अमेरिकेनंतर रशियाची 'ओपन स्काय करारातून' माघार; जाणून घ्या कारण
putin 2.jpg

रशियाचे (Russia) राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन(Vladimir Putin) यांनी ओपन स्काय नियंत्रण करारावर स्वाक्षरी केल्याने ते या करारामधून पडले आहेत. यापूर्वी या करारानुसार सदस्य देशांना अवकाशात शस्त्र उडवण्याची अनुमती होती. रशियाने आशा दर्शवली होती की, अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) या महिन्यामध्ये होणाऱ्या बैठकीत या करारावर चर्चा करतील. पण बायडन प्रशासनाने रशियाला स्पष्टपणे सांगितले की, अमेरिका या करारातून बाहेर पडल्यामुळे या पुढे ते चर्चेत सहभागी होणार नाहीत. 2020 मध्ये  या करारतून अमेरिका बाहेर पडला आहे. (Russia withdraws from Open Sky Agreement after US Know the reason)

कराराचा हेतू काय?
ओपन स्काय कराराचा(Open Sky Agreement) मुख्य उद्देश पश्चिमी देश आणि रशिया यांच्यात विश्वास वाढवणे हा आहे. तसेच सदस्य देश असणाऱ्या देशांच्या आणि त्यांच्या क्रियकल्पांविषयी माहिती संग्रहित करण्याची परवानगी देणे, त्यातबरोबर सदस्य देशांच्या सैनिकी क्षेत्रावरुन उड्डाणे करणे हा होता. 1992 मध्ये झालेल्या करारामध्ये बरचशे देश सहभागी होते.

अमेरिकेने एका वर्षापूर्वीच केली होती घोषणा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या आगोदर अमेरिका या करारातून माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. रशियाकडून या कराराच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. सध्यस्थितीत माजी राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयावर जो बायडन प्रशासनाने ठाम राहण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे रशियाने हा करार संपुष्टाच आणल्याचा दोष अमेरिकेला दिला आहे. मागील आठवड्यात रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने ओपन स्काय करार संपुष्टात आणण्यासाठी मतदान घेतले होते. हेलसिंकीमध्ये 24 मार्च 1992 रोजी ओपन स्काय करारावर स्वाक्षरी अखेर केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com