Video: Ukraine ने रशियन हेलिकॉप्टरला हवेतच केलं लक्ष्य, Drone ची कमाल

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.
Video: Ukraine ने रशियन हेलिकॉप्टरला हवेतच केलं लक्ष्य, Drone ची कमाल
Mi-8 helicopterDainik Gomantak

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच युक्रेनच्या बॅरक्टर TB-2 (Bayraktar TB-2) ड्रोनमुळे रशियन लष्कराचे मोठे नुकसान होत आहे. आता ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर (Social Media) साइट्सवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सॅटेलाइट-नियंत्रित ड्रोन स्नेक बेटावर (Snake Island) उतरत असलेल्या रशियन एमआय-8 हेलिकॉप्टरला हवेतल्या हवेतच उडवताना दिसत आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि काळ्या समुद्रातील बेटावर गेल्या काही आठवड्यांत रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे, मात्र युक्रेनने (Ukraine) शत्रूचा सामना करण्यासाठी हवाई मोहिमेला वेग दिला आहे.

दरम्यान, एका काळ्या-पांढऱ्या व्हिडिओ फुटेजमध्ये रशियन लष्करी हेलिकॉप्टरचा स्फोट होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. युक्रेन वेपन ट्रेकरने रविवारी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला. रशियन सैनिक हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असल्याचे एरियल व्ह्यूमध्ये दिसत आहेत, परंतु काही सेकंदांनंतर ड्रोनने त्यांना लक्ष्य केले.

Mi-8 helicopter
Russia-Ukraine War: 'अचानक', अमेरिकेची फर्स्ट लेडी युध्दग्रस्त युक्रेनमध्ये !

यानंतर व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमधून धूर निघताना दिसत आहे. ड्रोन स्नेक आयलंडपासून दूर जाताना दिसत आहे. दरम्यान या स्फोटात कोणी ठार झाले की जखमी झाले हे स्पष्ट झालेले नाही.

याशिवाय, युक्रेनच्या लढाऊ विमानांनी स्नेक आयलंडवर कब्जा करणाऱ्या रशियन सैन्यावर हवाई हल्ला केला, तेव्हा हे फुटेज प्रसिद्ध करण्यात आले. हा हवाई हल्ला Su-27 ने केला होता जो TB-2 ड्रोनवरील गिम्बल-माउंट कॅमेऱ्याने टिपला होता. त्यांनी 110 एकर बेटावरील किमान तीन एयर डिफेंस सिस्टम आणि पाळत ठेवणाऱ्या नौका नष्ट केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.