रशियन हॅकरचा अमेरिकेवर हल्ला

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

सायबर हल्ल्यामुळे सरकारचे सायबर नेटवर्क देखील सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. याआधीही या नेटवर्कवर अशाप्रकारचे हल्ले करण्यात आले होते.

वॉशिंग्टन: रशियन हॅकरनी हेरगिरी करण्याच्या उद्देशाने संगणकीय यंत्रणांमध्ये घुसखोरी केल्याची बाब आढळून आल्यानंतर अमेरिकेतील तपाससंस्था आणि खासगी कंपन्यांना त्यांचे नेटवर्क सुरक्षित करताना मोठी धावाधाव करावी लागली. 

या हल्ल्याची तातडीने दखल घेत होमलँड सिक्युरिटीच्या सायबर सिक्युरिटी युनिटने सोमवारी अलर्ट जारी करून सर्व कंपन्या आणि तपास संस्था यांना त्यांच्या सॉफ्टवेअर व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते.अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने तयार केलेली अभेद्य अशी सायबर भिंत भेदण्यामध्ये या हॅकरना यश आले असून यामाध्यमातून त्यांनी वित्त आणि वाणिज्य विभागातील काही महत्त्वाच्या फाईल्सना हात लावण्यात यश मिळविले आहे.

नेटवर्क मजबूत करावे लागणार
सायबर हल्ल्यामुळे सरकारचे सायबर नेटवर्क देखील सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. याआधीही या नेटवर्कवर अशाप्रकारचे हल्ले करण्यात आले होते. संरक्षणापेक्षा गुन्हा करणे अधिक सोपे असते त्यामुळे आम्हाला हे नेटवर्क मजबूत करण्यावर आणखी बरेच काम करावे लागणार असल्याचे सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने म्हटले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या