पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? एलन मस्क यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आलं उधाण

जगातील अब्जाधीशांच्या (Billionaires) संख्येबाबत नेहमीच चर्चा होत असते.
पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? एलन मस्क यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आलं उधाण
Russian President Vladimir PutinDainik Gomantak

जगातील अब्जाधीशांच्या संख्येबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आजकाल अब्जाधीशांचा क्लब वाढताना दिसत आहे. परंतु या सगळ्यानंतरही एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट आहे आणि ती म्हणजे एकच व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असू शकते. गेल्या काही वर्षांत, टेस्ला, स्पेसएक्स आणि द बोरिंग कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) हे एक मोठा विक्रम साधत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तथापि, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, एलन मस्क यांनी खुलासा केला की, मला वाटते की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Russian President Vladimir Putin is richer than I am said Elon Musk)

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज लावणे अवघड आहे. परंतु त्यांची एकूण संपत्ती पाहता असे म्हणता येईल की, मस्कही योग्यच असतील. तथापि, जर आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल बोललो तर एलन मस्क आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आहेत. वास्तविक, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Russian President Vladimir Putin
भारताने रशियाकडे केली 'ही' मागणी, पुतिन करणार का मान्य?

एलन मस्क किती श्रीमंत आहे?

celebritynetworth.com नुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती $250 अब्ज आहे. स्पेसएक्स, टेस्ला, द बोरिंग कंपनी आणि न्यूरालिंकसह त्यांच्या सर्व कंपन्यांना एकत्र केल्यास ही संपत्ती जमा होते. 2021 च्या शेवटी एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, जेव्हा त्यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना क्रमवारीत मागे टाकले. तथापि, जर्मन प्रकाशन कंपनी एक्सेल स्प्रिंगरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, एलन मस्क यांनी खुलासा केला की, मला वाटते की पुतीन माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत. तथापि, पुतिन यांची एकूण संपत्ती शोधणे सोपे काम नाही.

Russian President Vladimir Putin
पुतिन संपूर्ण जगावर राज्य करणार का? काय सांगते बाबा वेंगांची 'ही' भविष्यवाणी!

व्लादिमीर पुतिन खरोखरच एलन मस्कपेक्षा श्रीमंत आहेत का?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संपत्तीची प्राथमिक माहिती 2018 मध्ये उघड झाली होती. तेव्हापासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याच्या चर्चा सुरु होत्या. क्रेमलिनच्या मते, रशियन राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी $1,33,000 पगार मिळतो. मात्र, हा पैसा पुतिन यांच्या जीवनशैलीशी जुळत नाही. इनसाइडरच्या अहवालानुसार, रशियन सरकारचे माजी सल्लागार स्टॅनिस्लाव बेल्कोव्स्की यांनी पुतिन यांची संपत्ती $70 अब्ज असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हेज फंड मॅनेजर बिल ब्राउडर यांनी पुतीन यांची संपत्ती $200 बिलियनच्या जवळपास असल्याचा दावा केला होता. याबाबत त्यांनी 2017 मध्ये अमेरिकन सिनेटला माहिती दिली होती.

याशिवाय, काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर रशियन राष्ट्राध्यक्षांचा 1.4 अब्ज डॉलरचा राजवाडा असल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच मोनॅकोमध्ये 4 मिलियन डॉलरचे अपार्टमेंट असल्याचीही चर्चा आहे. मात्र, जोपर्यंत पुतिन स्वत: आपली संपत्ती उघड करत नाहीत, तोपर्यंत तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे, हे शोधणे फार कठीण काम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.