रशियाचे अध्यक्ष 'पुतिन यांना कर्करोग', या मित्राकडे सोपवणार 'सत्ता' : रिपोर्ट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी जाऊ शकतात.
रशियाचे अध्यक्ष 'पुतिन यांना कर्करोग', या मित्राकडे सोपवणार 'सत्ता' : रिपोर्ट
Vladimir PutinDainik Gomantak

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी जाऊ शकतात. यासाठी ते देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांच्याकडे तात्पुरती सत्ता सोपवू शकतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क पोस्टच्या एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे. पुतिन यांना ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आहे. (Russian President Vladimir Putin may go for cancer surgery)

Vladimir Putin
Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?

दरम्यान, न्यूयॉर्क पोस्टने टेलिग्राम चॅनेलचा हवाला दिला आहे. रशियन गुप्तचर एजन्सीचे पूर्व लेफ्टनंट जनरल यांनी ही माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. पुतिन लवकरच शस्त्रक्रियेसाठी जाऊ शकतात.

न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे की, रशियन अध्यक्षांना कर्करोग आणि पार्किन्सन्स रोगासह इतर शारीरिक समस्या असल्याची अफवा अलीकडच्या काळात पसरली होती. त्यावर दुसऱ्या एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, मीडियाच्या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. न्यू यॉर्क पोस्टने सांगितले की, ''अमेरिकेच्या (America) संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सोमवारी सांगितले की, “आम्हाला असे म्हणण्याची परवानगी देणारे काहीही मी पाहिले नाही.''

Vladimir Putin
Russia-Ukraine War: 'रशियाला मदत केल्यास...,' अमेरिकेने दिली चीनला धमकी

"आपल्या सर्वांना माहित आहे की, पुतिन पात्रुशेव्ह यांना त्यांचा एकमेव विश्वासू मित्र मानतात. त्याच वेळी, पुतीन यांनी वचन दिले आहे की, जर आपली प्रकृती खालावली तर, सत्ता पूर्णपणे पात्रुशेव्हकडे यांच्याकडे जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.