भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी टोचले चीनचे कान

दरम्यान, पूर्व लडाख मधील संघर्षाच्या इतर भागातून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यासाठी भारत आणि चीनने गुरूवारी लष्करी चर्चेची 14 वी फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले आहे .
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी टोचले चीनचे कान
S. Jaishankar slams China on India China border dispute Dainik Gomantak

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी शुक्रवारी सांगितले की भारत आणि चीन त्यांच्या संबंध (India China Relation) सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहेत कारण बीजिंगने (Beijing) करारांचे उल्लंघन करून काही क्रियाकलाप केले आहेत, ज्यासाठी आतापर्यंत विश्वासार्ह स्पष्टीकरण देखील दिलेले नाही. चीनला (China) भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध कसे ठेवायचे आहेत हे आता त्यांच्या नेतृत्वाने ठरवावे असे देखील जयशंकर यांनी खडसावले आहे. (S. Jaishankar slams China on India China border dispute)

सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना 'मॅसिव्ह पॉवर कॉम्पिटिशन: अॅन इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर' या विषयावरील परिसंवादात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, "की चीनला भारताबरोबरच्या संबधाबद्दल काहीच गांभीर्य नाही आणि चीनला याबाबत जणून घ्यायची देखील इच्छा नाही."असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत. मी अगदी स्पष्टपणे बोलतो हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे स्पष्टपणाची कमतरता नाही हे समजू शकते. जर चीनला ते ऐकायचे असेल तर मला खात्री आहे की ते ऐकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर झालेल्या अडथळ्याचा संदर्भ देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आम्ही आमच्या संबंधांमध्ये वाईट टप्प्यातून जात आहोत कारण चीनने दोन्ही देशांमधील करारांचे उल्लंघन करून काही पावले उचलली आहेत." आणि हे चिंताजनक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. भारत आणि चीनच्या लष्करांमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवर गेल्या वर्षी 5 मे रोजी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.तेंव्हापासून दोन्ही देशांमधये सतत चर्चा होत आहेत. पंगांग तलावाशेजारील भागातही दोघांमध्ये हिंसक संघर्ष झाला आणि दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक आणि शस्त्रे तेथे तैनात केली होती. गेल्या वर्षी 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर तणाव आणखी वाढला होता. तथापि, लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, दोन्ही बाजूंनी फेब्रुवारीमध्ये पंगांग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील किनारी आणि ऑगस्टमध्ये गोगरा भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली. शेवटची लष्करी चर्चा 10 ऑक्टोबर रोजी झाली होती, जी अनिर्णित होती.

दरम्यान, पूर्व लडाख मधील संघर्षाच्या इतर भागातून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत आणि चीनने गुरूवारी लष्करी चर्चेची 14 वी फेरी लवकरात लवकर घेण्याचे मान्य केले आहे .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com