चंद्रावरील मातीचे नमुने ‘ऑर्बिटर’च्या ताब्यात

PTI
सोमवार, 7 डिसेंबर 2020

चांद्रभूमीला स्पर्श केलेल्या चीनच्या चेंगई-५ या अवकाशयानातील लँडरने गोळा केलेले मातीचे आणि खड्यांचे नमुने चंद्राभोवती फिरणाऱ्या ‘ऑर्बिटर’कडे सुपूर्द केले आहेत.

बीजिंग : चांद्रभूमीला स्पर्श केलेल्या चीनच्या चेंगई-५ या अवकाशयानातील लँडरने गोळा केलेले मातीचे आणि खड्यांचे नमुने चंद्राभोवती फिरणाऱ्या ‘ऑर्बिटर’कडे सुपूर्द केले आहेत. हे नमुने आता पृथ्वीवर परत आणण्याचे मोठे आव्हान असून गेल्या ४५ वर्षांमध्ये प्रथमच चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. 

‘चेंगई-५’ हे यान २४ नोव्हेंबरला अवकाशात गेले होते. या यानाचे ‘ऑर्बिटर’, ‘लँडर’,‘असेंडर’ आणि ‘रिटर्नर’ असे चार विशेष भाग आहेत. यानातील असेंडर व लँडर जोडीने चंद्राच्या पृष्ठभागाला एक डिसेंबरला स्पर्श करत ड्रिलिंगही केले होते. 

 

संबंधित बातम्या