कृष्णवर्णीय महिलेच्या मानेवर साओ पावलो पोलिसाचा पाय

Avit Bagle
गुरुवार, 16 जुलै 2020

एका लष्करी पोलिसाने कृष्णवर्णीय महिलेच्या मानेवर पायाने जोर दिला.

साओ पावलो

अमेरिकेत पोलिसांच्या अतिरेकी बळामुळे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याचा बळी गेल्यामुळे अनेक देशांत निदर्शने होत असताना ब्राझीलमध्येही असा संतापजनक प्रकार घडला आहे. एका लष्करी पोलिसाने कृष्णवर्णीय महिलेच्या मानेवर पायाने जोर दिला.
मे महिन्यात ३० तारखेला घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संबंधित पोलिस आणि त्याचा सहकारी अशा दोन जणांवर गुन्हेगारी आरोप दाखल करण्यात आले आहेत. या महिलेचा एक छोटा बार आहे. ती मध्यमवयीन आहे. तिला पाच अपत्ये आहेत. तिच्या मानेचे हाड मोडले असून १६ टाके घालावे लागल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. पोलिसांनी हातात बेड्या घालून तिला पदपथासमोर फरफटत आणले होते. हे दृश्य प्रत्यक्ष पाहिलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्डिंग केले. प्रांताचे गव्हर्नर जोओ डोरिया यांनी सांगितले की, असे छळवणूकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. दोन्ही पोलिसांन निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान, पोलिसांची नावे मात्र जाहीर करण्यात आली नाहीत.

बॉडीकॅम लावणार
साओ पावलो प्रांतात दोन हजार पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या शरीरावर आता कॅमेरा (बॉडीकॅम) लावण्याचा निर्णय सरकारने घेतल आहे.

 

 

 

संबंधित बातम्या