अमेरिकेला मिळाली पहिली 'ट्रान्सजेंडर' सीनेट सदस्य

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

विजयी झाल्यावर मॅकब्राइड यांनी मंगळवारी रात्री संवाद साधताना सांगितले की, आजच्या विजयानंतर येथील मतदार हे खुल्या विचारांचे असून ते उमेदवारांच्या ओळखीला किंमत देत नसून नियतीला जास्त किंमत देतात.

वॉशिंग्टन- डेमोक्रेटच्या उमेदवार साराह मॅकब्राइड यांनी डेलावेअर राज्य सीनेटसाठीची निवडणूक जिंकली आहे. औपचारिकता पार पडल्यावर त्या अमेरिकेच्या पहिल्या ट्रान्सजेंडर सीनेटर म्हणून नवा इतिहास रचणार आहेत. मॅकब्राइड यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्टीव वॉशिंग्टन यांना पराभूर करत ही आपला विजय साजरा केला आहे.

विजयी झाल्यावर मॅकब्राइड यांनी मंगळवारी रात्री संवाद साधताना सांगितले की, आजच्या विजयानंतर येथील मतदार हे खुल्या विचारांचे असून ते उमेदवारांच्या ओळखीला किंमत देत नसून नियतीला जास्त किंमत देतात. आपल्याला यावर पूर्ण विश्वास होता. आज त्याची प्रचिती आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 'मला आशा आहे की डेलावेअरमधील किंवा देशाच्या इतर भागात राहणाऱ्या एका 'एलजीबीटीक्यू' मुलगा हा निकाल बघून समजू शकेल की लोकशाहीत त्यांचेही स्थाने आहे', असेही त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले. 

मॅकब्राइड यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर व्हाईटमध्ये याआधी काम केले आहे. त्यांनी 2016 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण केले होते. त्यावेळी असे जाहीर भाषण देणाऱ्या त्या पहिल्या ट्रान्सजेंडर होत्या. 

संबंधित बातम्या