मायक्रोसॉप्टच्या अध्यक्षपदी सत्या नाडेला यांची वर्णी

मायक्रोसॉप्टच्या अध्यक्षपदी सत्या नाडेला यांची वर्णी
satya.jpg

सॉप्टवेअर (Software) निर्मात्या मायक्रोसॉप्ट कॉर्पोरेशनने (Microsoft Corporation) सत्या नाडेला (Satya Nadella) यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाडेला 7 वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने  नवीन उंची गाठली आणि त्यांना त्याचे बक्षीसच मिळाले आहे. जॉन थॉमसन (John Thomson) यांची जागा सत्या नाडेला यांनी घेतली आहे.  थॉमसन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेट डायरेक्टरच्या (Lead Independent Director) भूमिकेत असणार आहेत. 2014 मध्ये थॉमसन यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्याआगोदर ते कंपनीच्या बोर्डामध्ये स्वतंत्र संचालक होते. 2014 मध्ये मायक्रोसॉप्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 53 वर्षीय नाडेला यांची नियुक्ती करण्यात आली होती.ज्यावेळी त्यांनी पदभार स्विकारला त्यावेळी त्यांच्या समोर मोठ्याप्रमाणात संकटं निर्माण झाली होती. मायक्रोसॉप्टला नाडेला यांनी केवळ संकटातून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉप्टवेअर फ्रॅंचायझीला पुनरुज्जीवीत करताना मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स, क्लाउड कंप्यूटिंग आणि कृत्रिम बुध्दिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

मायक्रोसॉप्ट कंपनीच्या शेअरच्या किंमतीत सात पटींनी वाढ
मायक्रोसॉप्टच्या शेअर्सची किंमत नाडेला यांच्या कार्यकाळामध्ये सातपटीहून अधिक वाढली आणि मार्केट कॅप 2 ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली होती. कंपनीचे  नाडेला तिसरे अध्यक्ष होतील. याआगोदर बिल गेट्स आणि थॉमसन हे कंपनीचे अध्यक्ष होते. स्टीव्ह बाल्मर (Steve Ballmer) कंपनीचे नाडेला मुख्य कार्यकारी अधिकारी होते. कंपनीचे थॉमसन हे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहतील आणि सत्या नाडेला यांच्या भरपाई, यशाचे नियोजन, बोर्ड कार्यांची देखरेख आणि प्रशासन, असे कंपीनेने एका निवेदनात म्हटले आहे.

सत्या नाडेलांचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद
नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये (Hyderabad) झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यांनतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर सायन्स आणि शिकागो विद्यापीठामधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. मायक्रोसॉप्टमध्ये 1992 दाखल झाले. मायक्रोसॉप्टमध्ये जाण्यापूर्वी नाडेला यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते. 

तसेच, मायक्रोसॉप्ट सेंट्रलचे 2000 मध्ये नाडेला उपाध्यक्ष होते. त्यानंतर मायक्रोसॉप्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पेरेट उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉप्ट ऑनलाईन सर्व्हिससचे वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नेमणूक झाली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com