China: सौदी अरेबिया अन् इराण यांच्यातील कराराचा भारतावर होणार परिणाम?

China: इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक सामंजस्य करार झाला आहे.
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Crown Prince Mohammed bin Salman of Saudi ArabiaDainik Gomantak

China: मिडल ईस्टमध्ये सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये शत्रुत्व असलेले दिसून येते. या दोन देशांच्या आरोप- प्रत्यारोपामुळे सौदी अरेबिया आणि इराण चर्चेचे कारण बनतात.

आता चीनच्या मध्यस्तीने या दोन देशांनी सांमजस्याचा करार केला आहे. चीनची राजधानी बीजींगमध्ये चार दिवस चर्चा चालू होती. त्यानंतर इराण आणि सौदी अरेबियामध्ये राजनैतिक सामंजस्य करार झाला आहे.

दोन्ही देशामध्ये सामंजस्य करार करुन आणण्यामध्ये चीनची महत्वाची भूमिका आहे. हा करार यशस्वी झाला तर त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो कारण यामध्ये चीनची मोठी भूमिका आहे, असे तज्ञांकडून मत व्यक्त केले जात आहे.

Crown Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia
Nepal PM Twitter Account: नेपाळच्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट झाले हॅक

काही तज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात वाद असल्याने आंतरारष्ट्रीय पातळीवरील या दोन देशाबाबतच्या मुद्यावर भारता( India )ला दुविधेचा सामना करावा लागत होता.

कारण भारताचे दोन्ही देशाबरोबर संबंध चांगले आहेत. आता दोन्ही देशातील संबंध सुधारले तर भारताची दुविधा कमी होण्यास मदत होईल असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com