महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या 'लूजैन' यांना ६ वर्षांचा तुरूंगवास

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

राज्याविरोधात षडयंत्र रचणे तसेच विदेशी शक्तींना सोबत घेऊन कट रचणे या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी तेथील न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सौदी अरेबियात महिलांच्या अधिकारांची लढाई लढणाऱ्या लूजैन अल-हथलौल या ३१ वर्षीय महिलेला ६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २०१८ मध्येच लूजैनला अटक करण्यात आली होती. आता तिला ५ वर्ष आणि आठ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्याविरोधात षडयंत्र रचणे तसेच विदेशी शक्तींना सोबत घेऊन कट रचणे या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी तेथील न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने तिला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेत २ वर्ष आणि १० महिन्यांचा कालावधी कमी केला असून तिची शिक्षेची तारीख मे २०१८ पासून गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे लूजैनला आता फक्त तीन महिनेच तुरूंगवास भोगावा लागणार आहे. या गुन्ह्यात सौदीच्या  वकीलावर लूजैनवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही लावण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने या  आरोपांना तथ्यहीन सांगत याविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. 

सौदी अरेबियाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय संवेदनशिल आहे. विशेषत: अमेरिकेत जो बायडेन यांचे सरकार आले आहे. लूजैन यांना जर जास्त काळ तुरूंगवासात ठेवले तर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता येण्याचीच जास्त शक्यता आहे. लूजैन यांच्या बाबतीत सौदी याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर वादात सापडला होता. आता या शिक्षेनंतर जगभरातून सौदी अरेबियावर टीका होत आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने याला 'संकटात टाकणारे' पाऊल असल्याचे म्हटले आहे. मात्र, लूजैन यांना लवकरात लवकर मुक्त केले जावे अशी आशाही त्यांनी व्यक्त  केली आहे. 

 

संबंधित बातम्या