फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट

गोमंतक वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

फ्रान्समध्ये संसर्ग वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी जाहीर करतानाच फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी कोरोना संसर्गाची लाट देशात आली असल्याचा इशारा दिला आहे.

पॅरिस : फ्रान्समध्ये संसर्ग वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी जाहीर करतानाच फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी कोरोना संसर्गाची लाट देशात आली असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात फ्रान्समधील आठ विभागांमध्ये लागू झालेली संचारबंदी आज एकूण ३८ भागांत लागू करण्यात आली. ही संचारबंदी सहा आठवड्यांसाठी लागू असेल. आज पत्रकार परिषदेत बोलताना कॅस्टेक्स म्हणाले की, फ्रान्ससह युरोपात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे.

सध्या फ्रान्समध्ये कोरोनाचे ७ लाख ५६ हजार ४७२ रुग्ण आहेत. दुसऱ्या लाटेत दिवसाला किमान २० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. 
फ्रान्समधली पहिली लाट ओसरली, तेव्हा तेथील रुग्णवाढीची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. त्यामुळे फ्रान्स सरकारने देशात लागू असलेले निर्बंध उठवले होते. तसेच, बहुतेक व्यवहार सुरळीतपणे सुरू केले होते. मात्र, काही दिवसांतच फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा एकदा सरकारला कर्फ्यू जाहीर करावा लागला.

संबंधित बातम्या