इराणला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी मुत्सद्दीपणा हाच उत्तम मार्ग - परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

गरज पडल्यास इराण युरेनियम समृद्धीची प्रक्रिया 60 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे वक्तव्य इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी आज केले आहे. 

अमेरिका जगातील अण्वस्त्र कार्यक्रमाला आळा घालण्याच्या उद्देशाने इराण आणि इतर देश यांच्यामधील करार अजून बळकट व विस्तारित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आज म्हटले आहे. तर युनायटेड नेशन्सच्या निरीक्षण पथकाने काल तेहरानने स्नॅप इन्स्पेक्शन थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे इराण सोबत तीन महिन्यांपर्यंत दोन्ही बाजूंनी आवश्यक आण्विक कार्यक्रमासंदर्भातील देखरेख करण्यासाठी केलेला करार अडकला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीचे (आयएईए) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी मागील आठवड्याच्या अखेरीस इराणला दिलेल्या भेटीनंतर तेहरान आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीसोबतचे सहकार्य कमी करण्याच्या योजनेसह पुढे जाणार असल्याचे नमूद केले होते. 

'बुध्द तांदूळ' सिंगापूरमध्ये निर्माण करणार आपली ओळख

त्यानंतर, आज युनायटेड नेशन्सने जिनिव्हा मध्ये आयोजित केलेल्या निःशस्त्रीकरणावरील परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी इराणने अण्वस्त्र मिळवू नये यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे सांगितले. अँटनी ब्लिंकेन जिनिव्हा मधील भाषण हे रेकॉर्ड केलेले होते. या भाषणात इराणला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी मुत्सद्दीपणा हाच एक उत्तम आणि योग्य मार्ग असल्याचे अँटनी ब्लिंकेन यांनी नमूद केले. याशिवाय इराणने 2015 मध्ये करण्यात आलेल्या अणुकराराचे काटेकोर आणि नियमितपणे पालन केल्यास, अमेरिकेचे प्रशासन देखील यावर सहमत राहणार असल्याचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले असल्याचे ब्लिंकेन यांनी यावेळी सांगितले. 

याशिवाय, सहयोगी आणि भागीदारांसह जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शनमध्ये मोठी व मजबूत योजनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी सांगितले. आणि इराणच्या क्षेत्र अस्थिर करण्याच्या वर्तनावर, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकास व प्रसारासह चिंतेच्या अन्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे अँटनी ब्लिंकेन यांनी या परिषदेत अधोरेखित केले. याउलट गरज पडल्यास इराण युरेनियम समृद्धीची प्रक्रिया 60 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे वक्तव्य इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी आज केले आहे. 

चीन सरकारने केली आपल्याच पत्रकारांवर कारवाई...

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री जावद जरीफ यांनी यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना, अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाकडे 2015 मध्ये झालेल्या अणुकरारामध्ये प्रवेश करण्यासाठी मर्यादित संधीची खिडकी खुली असल्याचे म्हटले होते. इराणसोबत झालेल्या करारामध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठी अमेरिकेला अमर्याद वेळ नसल्याचे म्हणत, घड्याळाचे काटे सतत फिरत असल्याचे देखील जावद जरीफ यांनी याअगोदर सांगितले होते. तसेच  अमेरिकेने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध मागे घेतल्यास, कमीत कमी 8,000 पौंड समृद्ध युरेनियम एका दिवसात पुन्हा 2015 मध्ये ठरलेल्या करारानुसार मागे घेतले जाऊ शकते, असे जावद जरीफ यांनी या मुलाखतीत म्हटले होते.              

संबंधित बातम्या