US News: वॉशिंग मशीनमध्ये आढळला सात वर्षीय मुलाचा मृतदेह, अमेरिकेतील घटना

Crime
CrimeDainik Gomantak

अमेरिकेतून (America) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षीय मुलाचा मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये (Washing Machine) आढळून आला आहे. मुलगा मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांत दाखल केल्यानंतर, 2 ते 3 तासानंतर हा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पालकांनी या मुलाला 2019 मध्ये दत्तक घेतले असल्याची माहिती उघड झाली आहे. (Seven-Year-Old Boy In US Found Dead Inside Washing Machine)

Crime
Rotary Rain Run : मोहित, दक्षयानी अर्धमॅरेथॉनमध्ये अव्वल

फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेच्या टेक्सास शहरातील ही घटना आहे. ट्रॉय खोएलर असे या मयत मुलाचे नाव आहे. ट्रॉय स्थानिक वेळेनुसार सकाळी 6:30 च्या सुमारास बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. या वेळी त्याचे वडील घरीच होते. त्याची आई रुग्णालयातील रात्रीची शिफ्ट उरकून घरी आली तर, घरात पोलिस आल्याचे तिला दिसले. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसून, तपास सुरू असल्याचे बातमीत म्हटले आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मुलगा घरच्या गॅरेजमध्ये असलेल्या मोठ्या वॉशिंग मशीन जवळ खेळत होता. काही कालावधीनंतर त्याचा मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये आढळून आला. दरम्यान, खेळताना त्याचा नक्की अपघात कसा झाला आणि मृत्यू झाला हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Crime
राज्याच्या शिक्षण विभागात कोणतीही विशेष शिक्षण शाखा नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com