प्रसिध्दी मिळुनही कोसळले फेसबुकचे शेअर्स

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

युगोवा सेंटर फॉर ग्रोथ अँड ऑपर्च्युनिटीच्या नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे गूगल, मेझॉन, मायक्रोसॉफ्ट किंवा टिकटॉकच्या तुलनेत अमेरिकेतले लोक फेसबुकवर अविश्वास दाखवत आहे.

नवी दिल्ली: फेसबुक हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणारे अ‍ॅप आहे. फेसबुकचा व्यवसाय कदाचित भरभराटीचा असेल परंतु त्याची विश्वासार्हता आता ढासळच जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. युगोवा सेंटर फॉर ग्रोथ अँड ऑपर्च्युनिटीच्या नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे गूगल, मेझॉन, मायक्रोसॉफ्ट किंवा टिकटॉकच्या तुलनेत अमेरिकेतले लोक फेसबुकवर अविश्वास दाखवत आहे. या सर्वेक्षणात सुमारे 40 टक्के लोकांनी म्हटले आहे की वैयक्तिक डेटा सुरक्षेच्या बाबतीत त्यांचा फेसबुकवर अजिबात विश्वास नाही. 39 टक्के लोक म्हणाले की फेसबुक कंपनीला जर काढून टाकले तर ते जगासाठी अधिक चांगले होईल.

परंतु या सगळ्या लोकांच्या बदलत्या मतांचा फेसबुकच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या आठवड्यात उघड झालेल्या आकडेवारीनुसार वॉल स्ट्रीटच्या (अमेरिकन स्टॉक मार्केट) अंदाजानुसार गेल्या वर्षी फेसबुकचा नफा स्थिर गतीने वाढला होता. कोरोना महामारीचा त्याच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र असे असूनही गेल्या आठवड्यात फेसबुक शेअर्सच्या किंमतीत घट झाली आहे. या कारणांमुळे गुंतवणूकदारांना ही भीती आहे की या कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीमधील प्रस्तावित बदलाचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होईल. एक आठवडा गेला तरी शेअर्सच्या किंमतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

याच कारणामुळे गुरुवारी जाहीर झालेल्या फॉर्च्युन मासिकाच्या सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांच्या यादीमध्ये फेसबुकचे नाव नाही. या यादीमध्ये अपल कंपनी सलग 14 व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आली आहे. जुलै 2020 च्या एक्सयोस /हॅरिसच्या सर्वेक्षणात कॉर्पोरेट प्रतिष्ठेच्या यादीमध्ये 100 कंपन्यांमध्ये फेसबुक 97  व्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये 94 व्या स्थानी होते. जुलै 2020 मध्ये प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात अमेरिकेच्या दोन तृतीयांश लोकांनी असे म्हटले आहे की, सोशल मीडियाचा सामान्यपणे देशाच्या विकासावर वाईट परिणाम होत असतो.

पेटीएम वापरकर्त्यांना झटका!  क्रेडिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर करणे महागले -

विश्लेषकांचे म्हणणे आहे की फेसबुक कंपनीसमोर अनेक गंभीर संकटे उद्भवली असून यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होत आहे वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने आपल्या वृत्तानुसार, काही गृप शस्त्रे जमा करीत असून हिंसाचाराची योजना आखत असल्याची माहिती फेसबुकला आधीपासूनच मिळाली होती. गेल्या आठवड्यात फेसबुकने म्हटले होते की यापुढे आपल्या फेसबूकवर नागरी किंवा राजकीय गृपमध्ये सामील होण्याचे नोटिफिकेशन येणार नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान सवयीचे गुलाम; आवळला पुन्हा कश्मीरी राग -

मक्तेदारीच्या आरोपात गुगल आणि फेसबुकवर कारवाई सुरू झाली आहे. अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर दावा दाखल केला आहे. अनेक संसदीय सुनावणींमध्ये फेसबुक अधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. या सर्वांचा फेसबुकच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे. आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात, फेसबुकने आता बाह्य एजन्सीला कटेंट देखरेखीचे काम देण्यास पुढाकार घेतला आहे. फेसबुकच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे फेसबूकचे संकट आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

 

संबंधित बातम्या