'ती'ने दिले 100 हून अधिक महिला,मुलांना ISIS साठी प्रशिक्षण

कॅन्सस येथील महिलेला ISIS ला मदत केल्या प्रकरणी ठरवले दोषी
ISIS News
ISIS NewsDainik Gomantak

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅड सीरिया ही संघटना दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असते. याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसला आहे. अशाच प्रकारे अमेरिकेतील कॅन्सस येथील एका महिलेला जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला मदत केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ( She trained women and children for ISIS )

एलिसन एलिझाबेथ फ्लुक-एक्रेन असे या महिलेचे नाव आहे. एलिसन ही महिला 2012 मध्ये 100 महिला आणि मुलांच्या बटालियनचे प्रशिक्षण आणि नेतृत्व करण्यासाठी सीरियाला गेली होती. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने लिबिया, तुर्की आणि इजिप्तमध्ये राहून अन्सार अल-शरिया या दहशतवादी संघटनेसोबत काम केले आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, या महिलेने सीरियामध्ये राहून 100 हून अधिक महिला ISIS साठी मुलांना प्रशिक्षण दिले होते.

ISIS News
अफगाणिस्तानवर भूकबळीचं संकट; पोट भरण्यासाठी मुलांची मृत्यूशी झूंज

प्रशिक्षण देण्यात आलेल्यांमध्ये अनेकांचे वय त्यावेली 10 वर्षे होते. परंतु, या मुलांना बंदुका, ग्रेनेड आणि आत्मघाती बेल्ट वापरण्यास शिकवले. परंतु, एका सुनावणीदरम्यान फ्लुक-अक्रेनने दावा केला आहे की, ज्या मुलांना तिने प्रशिक्षण देले ती मुले अल्पवयीन होती याची तिला कल्पना नव्हती. "आम्ही हेतुपुरस्सर कोणत्याही तरुण मुलींना प्रशिक्षण दिले नाही," असे फ्लुक-अक्रेनने म्हटले आहे.

ISIS News
भारताचा व्हिएतनामसोबत लॉजिस्टिक करार

फ्ल्यूक-अक्रेन हिने युनायटेड स्टेट्समध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनांवर देखील चर्चा केली आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे एका शॉपिंग मॉलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनचा स्फोट करणे. फ्ल्यूक-अक्रेन तिच्या दुसऱ्या पतीसह ISIS मध्ये सामील झाली, त्याने सीरियामध्ये स्निपरच्या गटाचे नेतृत्व केले होते. 2016 मध्ये तो हवाई हल्ल्यात ठार झाला. या महिलेला जास्तीत जास्त 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिच्या शिक्षेवर 25 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

अमेरिकेच्या मध्य-पश्चिमी राज्य कान्सासमध्ये एका महिलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड अल-शाम या दहशतवादी संघटनांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे. खटल्यादरम्यान, महिलेने कबूल केले की तिने अमेरिकन कॉलेजवर हल्ला करण्याच्या कटामध्ये काम केले होते. यासाठी तिने सीरियातील महिला संघाच्या 100 हून अधिक फायटर्सना प्रशिक्षणही दिले आहे.

42 वर्षीय अॅलिसन फ्लुक-अक्रेनला 100 हून अधिक महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात तिची आई, शिक्षिका आणि ISIS बटालियनची लीडर असे वर्णन केले आहे. ती शेवटची 8 जानेवारी 2011 रोजी अमेरिकेत देण्यात आली होती तर यापूर्वी त्यांनी इजिप्त आणि लिबियाचा प्रवास देखील केला होता. त्यानंतर 2014 मध्ये तो सीरियाकडे वळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com