धक्कादायक!  चीनच्या वूहान लॅबमध्ये होतेय अनेक प्राणघातक विषाणूंची उत्पत्ती: पण का?

धक्कादायक!  चीनच्या वूहान लॅबमध्ये होतेय अनेक प्राणघातक विषाणूंची उत्पत्ती: पण का?
wuhan lab.jpg

जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून चीनची वूहान लॅब अनेकदा चर्चेत आली आहे.  कोरोना विषाणूची उत्पत्तीदेखील त्याच वूहान लॅबमध्ये झाली असल्याचा दावा जगभरातील अनेक संशोधकांनी केला आहे. पण वूहान लॅबमध्ये कोरोनाचा शोध लावल्याचा आरोप चीननेही अनेकदा फेटाळून लावला आहे. नोबेल पुरस्कार जिंकणारे फ्रान्सचे वायरोलॉजिस्ट लूक मॉटेंग्नियर यांच्यासह जगभरातील अनेक देशातील संशोधकांनी  काही महिन्यांपूर्वी चीनच्या वूहान लॅबमध्येच कोरोनाचा शोध लागल्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणू मानवनिर्मित असून त्याची उत्पत्ती प्रयोगशाळेत झाली असल्याचा दावा लूक यांनी केला होता.  तसचं लस बनवण्यासाठी सुरू असलेल्या  प्रयत्नांतून हा  संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणू तयार झाल्याचं ते म्हणाले होते. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राने याहून मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. (Shocking! Many deadly toxins originate in China's Wuhan Lab: but why?) 

वुहान लॅबने चिनी सैन्याच्या अनेक गुप्त मोहिमांसाठी मदत केली. इतकेच नव्हे तर सैन्याच्या या गुप्त मोहिमांसाठी गेल्या नऊ वर्षांपासून वूहान लॅबमधील शास्त्रज्ञ जीवशास्त्रातील 'डार्क मॅटर' विषयावर नवीन विषाणूंचा शोध लावत आहेत. तसेच आतापर्यंत वूहान लॅबने चीनी सैन्यासाठी अनेक प्राण्यांपासून होणाऱ्या प्राणघातक विषाणूंचा शोध लावला आहे, असा दावा या इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे.  तसेच, वूहान लॅबमधील हे संशोधक या विषाणूंचा शोध लावून रोगाचा प्रसार करण्यातही गुंतले आहेत. या कामात चीनी सैन्यातील अनेक लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश असलयाची माहिती या वृत्तपत्राने दिली आहे.  बोलायच झाल्यास,  गेल्या वर्षी जानेवारीत एका चिनी वैज्ञानिकांनी एक  जनरल प्रकाशित केले होते, ज्यात गेल्या तीन वर्षांत 143 नवे व्हायरसचा शोध लागल्याचे या जनरलने म्हटले आहे. 

चीनी सैन्याची वैज्ञानिकांना  मदत 
रिपोर्टनुसार, वुहान लॅबमधील वैज्ञानिकांनी चिनी सैन्याला प्राण्यांचे विषाणू शोधण्यास मदत केली. यासाठी पांच जणांच्या पथकात शि झेंगली उर्फ ​​'बॅट वूमन' आणि लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी काओ वुचुन हेदेखील चीनच्या गुंफांमध्ये प्राणी पक्षांचे नमुने शोधण्यासाठी गेले होते. तर चीनचे सैन्यच नव्हे तर चीनचे नागरिक देखील अशा प्रकारच्या व्हायरसचा प्रसार करण्याच्या मोहिमेत सामील असल्याचा आरोप अमेरिकेच्या वेंडेन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने केला आहे.  वुहान लॅबमधून कोरोना विषाणू पसरविण्याचा चीनवर आधीच आरोप आहे. पण चीन हे मान्य करण्यास तयार नाही. आताही जागतिक आरोग्य संघटनेने हे स्पष्ट केले आहे की वुहान लॅबमधून कोरोना पसरलेला नाही, तर एका प्राण्यापासून माणसापर्यंत कोरोनाचा प्रसार झाल्याच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

कोरोना विषणूची मुद्द्यावरून चीनवर जगभरातून टीका 
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अमेरिका आणि ब्रिटनसह इतर 12 देशांनी चीनला साथीच्या रोगाचा नमुने सामायिक करण्याचे आवाहन केले होते, परंतु बीजिंगने ते नाकारले. ज्यानंतर अनेक देशांनी चीनवर कडाडून टीका केली. त्याचबरोबर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने कोरोना महामारीच्या सुरवातीलाच वुहान लॅबमधील नवीन विषाणूविषयी माहिती दिली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने चीनसह जगभरात एक नवीन विषाणूचा थैमान घालेल, अशी धोक्याची सूचना दिली होती. 


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com