बापरे! शूजला तब्बल 13,41,82,440 डॉलर्सची बोली

बापरे! शूजला तब्बल 13,41,82,440 डॉलर्सची बोली
The shoes of American rapper Kanye West were sold for Rs 13 crore

हॉलिवूडमधील 'ड्रामा क्वीन' किम कार्दशियसोबतच्या संबंधामुळे चर्चेत आलेला अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याच्या नावावर एक नवीन विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. ग्रॅमी अवॉर्ड्सच्या वेळी कान्ये याने घातलेल्या 'नायकी' या जगप्रसिद्ध स्पोर्ट्स कंपनीचा शूजला विक्रमी किंमत मिळाली आहे. त्याने घातलेला हा शूज तब्बल 1.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये विकला गेलाय. सोमवारी लिलावाची घोषणा करण्यात आली असून कान्ये वेस्टच्या शूजसाठी विक्रमी बोली लागली. हा एक विश्वविक्रमच आहे. 

2008 सालच्या ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये कान्येने नाइक एयर येजी स्नीकर्स (शूज) घातले होते. हे वेस्ट आणि मार्क स्मिथच्या फॅशन लाईनचे प्रोटोटाइप्स होते, जे कान्येने परफॉर्मस दरम्यान सादर केले होते. 2008 च्या ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये 'हे ​​मामा' आणि 'स्ट्रॉगर' च्या परफॉर्मसच्या वेळी कान्ये वेस्टने त्याच्या स्नीकर्सचे प्रदर्शन केले होते. कान्ये याने 2013 मध्ये नायकीशी असलेला करार संपवत आदिदास ब्रँडशी करारबद्ध झाला.

12 नंबर साइजच्या ब्लॅक लेदर शूजमध्ये यीसी फोरफूट स्ट्रॅप आहे. या ब्रँडच्या लेसमध्ये 'वाई' मॅडलियन आहे. सोमवारी आयोजित केलेल्या लिलावात न्यूयॉर्कचे कलेक्टर रायन चँग यांनी सोथेबीज येथे विक्रीसाठी ठेवली होती. या लिलावात कान्ये वेस्टच्या या शूजची  1.8 दशलक्ष म्हणजे 13,41,82,440 डॉलर्सची बोली लागली.

गुंतवणूक प्लॅटफॉर्म रेयर्सनी खरेदी केलेल्या शूजसाठी आतापर्यंत लागलेली सर्वात मोठी बोली आहे. रेयर्स फ्रॅक्शनल ओनरशिपचा लिडर आहे. कान्ये वेस्टच्या या विक्रमी बोलीपूर्वी 1985 मध्ये एअर जॉर्डनच्या एका फुटवेयरला मोठी किंमत मिळाली होती. याचा वापर हा  बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डनने केला होता. याची किंमत 56,0000 यूएस डॉलर नोंदली गेली होती. आता कान्ये वेस्टच्या स्निकर्सनी हा विक्रम मोडला आहे. सुमारे 13 कोटींच्या किंमतीने नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com