भारताची अफगाणिस्तानला काबुल नदीवरील 'शहतूत' धरणाची भेट

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज झालेल्या व्हर्चुअल शिखर बैठकीत काही महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. या करारानुसार भारत अफगाणिस्तानमधील काबुल नदीवर शहतूत धरण बांधणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज झालेल्या व्हर्चुअल शिखर बैठकीत काही महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. या करारानुसार भारत अफगाणिस्तानमधील काबुल नदीवर शहतूत धरण बांधणार आहे. या धरणामुळे स्थानिक जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. आज भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांतील परराष्ट्र मंत्र्यांनी सामंजस्य करार केला. 

राज्यसभा: पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर; राज्यसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला दिला...

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या करारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शहातूत धरणाच्या बांधकामामुळे काबूलमधील लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल याचा आनंद असल्याचे म्हटले आहे. तर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी या धरणामुळे नैसर्गिक सौंदर्य पुनर्संचयित करण्याचे लक्ष्य पूर्ण करू शकणार असल्याचे म्हणत, कोरोनाच्या लसीसह अफगाणिस्तानला पिण्याच्या पाण्याची भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी आज दोन्हीचा देशांमधील व्हर्चुअल समिटला हजेरी लावली. यावेळेस दोन्ही नेत्यांनी प्रादेषिक विकासावर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांव्यतिरिक्त भारतचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि त्यांचे समकक्ष अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अतमर हे देखील उपस्थित होते. यावेळेस अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देशाला कोरोनावरील लस दिल्याबद्दल भारताचे आभार मानले. कोरोनाची लस ही अफगाणिस्तानसाठी अमूल्य भेट असल्याचे अश्रफ घनी म्हणाले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातील संबंध हे एक मैलाचा दगड पार करत असल्याचे सांगितले. याशिवाय भारत आणि अफगाणिस्तान हे भौगोलिक क्षेत्राशीच जोडलेले नाहीत तर आपला इतिहास आणि आपली संस्कृती देखील एकमेकांशी जोडली गेली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

शहतूत धरणाच्या व्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानला 80 दशलक्ष प्रकल्प उभारण्याचे आश्वासन आज झालेल्या करारातून दिले आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानमध्ये सुमारे दीडशे प्रकल्प देखील बांधण्याची घोषणा भारताने केली आहे. तर यापूर्वी मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या डोनर्स कॉन्फरन्स मध्ये, भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी भारत अफगाणिस्तान मध्ये काबुल नदीवरील शहतूत धरण बांधणार निर्माण करणार असल्याचे म्हटले होते. काबुल नदी ही अफगाणिस्तान मधील पाच नद्यांपैकी एक महत्वाची नदी आहे. या नदीवर धरण बांधल्यानंतर काबुल शहरातील वीस लाख जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे.     

संबंधित बातम्या