Sikh Students In US: अमेरिकन विद्यापीठांत शीख विद्यार्थ्यांना कृपाण बाळगण्याची मुभा

सप्टेंबर शीख विद्यार्थ्याला केली होती अटक; दिलगीरी व्यक्त करत बदलले धोरण
Sikh Students In US
Sikh Students In USDainik Gomantak

Sikh Students In US: अमेरिकेत शिकत असलेल्या शीख विद्यार्थ्यांना आता येथीलव विद्यापीठांमध्ये, शिक्षण संस्थामध्ये कृपाण बाळगता येणार आहे. अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांच्या धोरणात तसा बदल केला आहे. दोन महिन्यांपुर्वी एका शीख विद्यार्थ्याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर धोरणात बदल करून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Sikh Students In US
Viral News: नवऱ्याला लागली एक कोटीची लॉटरी, बायको प्रियकरासोबत गेली पळून

सप्टेंबरमध्ये महिन्यात एक शीख धर्मातील एक विद्यार्थी कृपाण परिधान करून नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात आला. तेव्हा त्याला कृपाण काढण्यास सांगण्यात आले. ते काढण्यास तो तयार नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. एका पोलिस अधिकाऱ्याने शीख विद्यार्थ्याने घातलेला कृपाण काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विद्यापीठाने विद्यार्थ्याची माफी मागितली

दरम्यान, या प्रकारानंतर विद्यापीठाचे कुलपती शेरॉन एल. गॅबर आणि मुख्य विविधता अधिकारी ब्रॅंडन एल. वुल्फ यांनी, कृपाण बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या अटकेबद्दल दिलगीर व्यक्त केली. विद्यापाठीच्या या नव्या धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Sikh Students In US
Firing in Colorado: कोलोरॅडोच्या 'गे क्लब'मध्ये गोळीबार; 5 ठार, 18 जखमी

शीख धर्मात कृपाणला महत्व

शीख धर्मात पाच गोष्टींना खूप महत्व आहे. या गोष्टी पवित्र मानल्या जातात. गुरू गोविंद सिंग यांनी शिखांसाठी या पाच गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. केश (केस न कापलेले), कडा (स्टील ब्रेसलेट), कृपाण (चाकुसारखे शस्त्र), कच्छा (अंडरशॉर्ट्स) आणि कांगा. हे सर्व शिखांनी अनिवार्यपणे परिधान केलेले आहेत. कृपाण हे शौर्याचे प्रतिक समजले जाते. हे शस्त्र शीख पुरूष, महिलांच्या कमरेला लटकलेले बऱ्याचदा दिसते. ते छोट्या तलवारीप्रमाणे असते. आजकाल कृपाणऐवजी छोटा चाकूही ठेवला जातो. तथापि, विद्यापीठाच्या नियमानुसार या कृपाणची लांबी 3 इंचापेक्षा जास्त असता कामा नये.

धार्मिक महत्व असल्याने आता शीख विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्येही कृपाण बाळगता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com