Istanbul: इस्तंबूलच्या गजबजलेल्या भागात भीषण स्फोट; सहा जण ठार, 53 जखमी

स्फोटानंतर आपत्कालीन विभागाच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
Istanbul Explosion
Istanbul Explosion Dainik Gomantak

Istanbul Explosion: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या गजबजलेल्या भागात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. तर, 53 जण जखमी झाले आहेत. अद्याप स्फोटाचं नेमकं अद्याप सापडलेलं नाही. एका शॉपिंग मॉलच्या परिसरात रविवारी (13 नोव्हेंबर) हा स्फोट झाल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

(Six dead, dozens wounded explosion in Istanbul, Turkey)

Istanbul Explosion
Indian Economy: भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होणार, अर्थमंत्री सितारमन यांचे देशासाठी मोठे स्वप्न

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैप्पप अर्दोआन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. स्फोटातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी म्हटले आहे. स्फोटानंतर आपत्कालीन विभागाच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोटानंतर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केली आहे.

Istanbul Explosion
Spanish Village On Sale: काय सांगता! अख्ख गावंच काढलंय विकायला, किंमत फक्त एवढी

स्फोटात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्तंबूलचे गव्हर्नर अली यरलियाका यांनी स्फोटाबाबत माहिती दिली आहे. "स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी हा स्फोट झाला. इस्तांबूलमधील इस्तिकलाल स्ट्रीट परिसरात ही घटना घडली."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com