इटलीतील महिलेला दिले एकाच वेळी फाइजर लसीचे सहा डोज

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

इटलीमधील एका महिलेला चुकून कोरोना लसीचे सहा डोस देण्यात आले. ही महिला 23 वर्षांची आहे आणि तिला चुकून फायझर लसीचे सहा डोस दिले गेले आहे. 

इटलीमध्ये(Intali ) आरोग्य कर्मचाऱ्यांना(Helth Worker) लस घेणे बंधनकारक केले आहे.त्याचबरोबर लस घेण्यास कुणी नकार दिला तर त्याला एक वेगळी शिक्षाही देण्यात आली आहे. इटलीमधील एका महिलेला चुकून कोरोना लसीचे(Vaccine) सहा डोस देण्यात आले. ही महिला 23 वर्षांची आहे आणि तिला चुकून फाइजर बायोएनटेकचे( pfizer biontech) सहा डोस दिले गेले आहे. लसीच्या अशा डोसचा महिलेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, मात्र तिला रुग्णालयात निगरानीखाली ठेवण्यात आले होते.(Six doses of Pfizer Biontech vaccine given to a woman in Italy)

आता महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इटलीमधील मध्यवर्ती टस्कनी येथील नोआ रूग्णालयात फिझर लसीचे हे सहा डोस देण्यात आले. रुग्णालयाचे डीन डॅनिएला यांनी ही माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले की त्या महिलेला 24 तास रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्या महिलेची प्रकृती आता ठीक असल्याने. 24 तास पाळत ठेवल्यानंतर महिलेला सोमवारी डिसार्ज देण्यात आला. एका आरोग्य कर्मचार्‍याने चूकून संपूर्ण कुपी सिरिंजमध्ये घेऊन त्या महिलेला टोचली. जे की त्या एका कुपीमध्ये लसीचे सहा डोस असतात. लवकरच आरोग्य सेवकाला त्याची चूक कळली आणि त्याने महिलेला त्याबद्दल सांगून खबरदार केले.

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली संसदेत बहुमत सिध्द करण्यास ठरले अपयशी !

रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्याने जेव्हा पाच रिकाम्या सिरिंज पाहिल्या तेव्हा त्याला त्याची चूक आली. त्यानंतर डॉक्टर लगातार डोस दिलेल्या महिलेवर लक्ष ठेवून होते. तीच्या प्रकृतीची काळजी घेत होते. महिला रुग्णांच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे परिक्षण आणि निरीक्षण करत होते. 

‘कोरोनाला रोखण्यासाठी चीननं जे वर्षभरापूर्वी केलं ते भारतानं करावं’; डॉक्टर फौचींचा सल्ला

आरोग्य कर्मचार्‍यांना लस घेणे आवश्यक 
ती महिला रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात एक इंटर्न होती. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.  ही पूर्णपणे मानवी चूक आहे आणि ती हेतुपुरस्सर केलेली नाही. एप्रिलच्या सुरुवातीस, इटालियन सरकारने आरोग्य कर्मचारी आणि फार्मसी कर्मचार्‍यांना लसी देणे बंधनकारक केले. जर एखाद्या आरोग्य सेवकाने लस घेण्यास नकार दिला तर त्याला किंवा तिला कोरोना रूग्णाशी संपर्क येणार नाही अशा  ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले होते.

संबंधित बातम्या