स्लिम-ट्रिम किम जोंग उनचा फोटो व्हायरल

उत्तर कोरियामध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे किम जोंग-उनने जेवण कमी केल्याचे सांगितले जात आहे.
North Korean leader: Kim Jong Un

North Korean leader: Kim Jong Un

File Image

North Korean leader: उत्तर कोरियाचे नेते किम जोंग (Kim Jong Un) यांचे वजन कमी झाल्याची चर्चा आतरराष्ट्रीय स्तरावर रंगत आहे. वजन कमी केल्यानंतर, सरकारी माध्यमांनी जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये किम खूपच स्लिम दिसत आहे. किमचे नवीन छायाचित्र कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (KCNA) प्रसिद्ध केले आहे. या आठवड्यात झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या वार्षिक सभेला त्यांनी हजेरी लावली होती.

डेली मेलमधील वृत्तानुसार, बैठकीत उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला आणि तेथे काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी किम यांना बोलावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाच फूट सात इंच किमचे वजन गेल्या वर्षी 140 किलो इतके होते. द सनच्या वृत्तानुसार, किमला लॉबस्टर खायला आवडते. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचे लोक उपासमार आणि गरिबीचा सामना करत आहेत. त्यामुळे हुकूमशहा किमनेही त्यांचा जेवणाचा डोस कमी केला आहे.

North Korean leader: Kim Jong Un

रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची केली चाचणी

अन्न टंचाई बद्दल चर्चा

या बैठकीत हुकूमशहा किमने वर्कर्स पार्टीच्या लोकांसोबत नव्या वर्षाची आपली योजना सांगितली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या या बैठकीत सर्व उच्च सरकारी अधिकारी आणि लष्कराचे जनरल सामील होते. मात्र, उपोषणाव्यतिरिक्त कोणत्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली, याबाबत माहिती देण्यात आली नाही.

नागरिकांना कमी खाण्याचे आवाहन

उत्तर कोरियामध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे किम जोंग-उनने जेवण कमी केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग-उनने आपल्या नागरिकांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत कमी अन्न खाण्याचे आवाहन केले आहे.

North Korean leader: Kim Jong Un

कोविड पॉझिटिव्ह महिलेला विमानातील बाथरुममध्येच केले 5 तास आयसोलेट

सुमारे 860,000 टन अन्नधान्याची कमतरता

ऑक्टोबरमध्ये किम जोंग-उन यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले होते की, जोपर्यंत उत्तर कोरिया 2025 मध्ये चीनसोबतची सीमा पुन्हा उघडत नाही, तोपर्यंत लोकांना कमी अन्न खावे लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की उत्तर कोरियामध्ये यावर्षी सुमारे 860,000 टन अन्नाची कमतरता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com