हिल स्टेशनवर कार बनली 'कबर'

बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पाकिस्तानच्या पीर पंजाल रेंजमध्ये असलेल्या मुरीमध्ये शनिवारी बर्फात अडकलेल्या कारमधील 16 जणांचा मृत्यू झाला.
Deaths due to snowfall in Pakistan
Deaths due to snowfall in PakistanDainik Gomantak

पाकिस्तानच्या पीर पंजाल रेंजमध्ये असलेल्या मुरीमध्ये शनिवारी बर्फात अडकलेल्या कारमध्ये (Deaths due to snowfall in Pakistan) 16 जणांचा मृत्यू झाला. हे पाहता मुरी शहर आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुरी टाउन हे पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब (Punjab) प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यात स्थित एक हिल स्टेशन आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद (Home Minister Sheikh Rashid Ahmed) म्हणाले की, पर्यटक इतक्या मोठ्या संख्येने आले की संकट उभे राहिले. शेख रशीद अहमद म्हणाले की, रावळपिंडी आणि इस्लामाबाद प्रशासन पोलिसांसह अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत. त्याचवेळी, रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्ससह पाकिस्तानी लष्कराच्या पाच प्लाटूनला आपत्कालीन आधारावर पाचारण करण्यात आले आहे.

Deaths due to snowfall in Pakistan
Haiti: हैतीमध्ये बंदुकधारी डाकूंची दहशत, दोन पत्रकारांना गोळ्या घालून जाळले जिवंत

मंत्री म्हणाले की हिल स्टेशनवर सुमारे 1,000 गाड्या अडकल्या आहेत. ते म्हणाले की 16 ते 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमद म्हणाले की मुरीच्या रहिवाशांनी अडकलेल्या पर्यटकांना अन्न आणि ब्लँकेट दिले. ते म्हणाले की प्रशासनाने हिल स्टेशनकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले आहेत आणि आता फक्त अन्न आणि ब्लँकेट गोळा करण्याचे नियोजन करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार (Punjab CM Usman Bujdar) यांनी मुरीमध्ये आपत्ती घोषित केली आणि रुग्णालये, पोलिस ठाणे, प्रशासन कार्यालये आणि बचाव सेवांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. त्यांनी प्रांतीय मुख्य सचिव, पोलीस महानिरीक्षक, मदत आयुक्त, बचाव 1122 चे महासंचालक आणि प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (PDMA) चे महासंचालक यांना मदतकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. बुजदार म्हणाले की, पर्यटकांना वाचवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली असून अन्न व जीवनावश्यक वस्तूही पुरविण्यात येत आहेत.

Deaths due to snowfall in Pakistan
श्रीलंकाने 'या' कारणासाठी भारताकडे मागितली मदत

बुजदार यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले की, अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. ते म्हणाले की, विश्रामगृहे आणि इतर ठिकाणे लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पर्यटकांना वाचवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली असून, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूही पुरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच बर्फात अडकलेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि या दुःखात आपण पीडितांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की आदल्या रात्री या भागातून 23,000 हून अधिक कार बाहेर काढण्यात आल्या होत्या आणि बचाव कार्य सुरू होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com