दक्षिण आफ्रिकेच्या संसद भवनला भीषण आग

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनस्थित संसद (South Africa Parliament) भवनात रविवारी आग लागली. दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
दक्षिण आफ्रिकेच्या संसद भवनला भीषण आग

South Africa Parliament

Dainik Gomantak 

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊनस्थित संसद भवनात रविवारी आग लागली. दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. आग इतकी भीषण होती की, केपटाऊनवर (Cape Town) धुराचे लोट उठताना दिसत होते.

दरम्यान, संसद (Parliament) भवन संकुलातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पायाभूत सुविधा मंत्री पॅट्रिशिया डी लिले यांनी सांगितले. येथून आग दक्षिण आफ्रिकेची संसद बसलेल्या नॅशनल असेंब्लीच्या कार्यालयात पसरली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपतीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याचे वर्णन केले. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, संसद भवनातील फायर अलार्ममध्ये गडबड झाल्याची बाबही समोर आली आहे. स्प्रिंकलर सिस्टिममध्ये काही समस्या असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमागील नेमके कारण जाणून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

इमारतींचे काही भाग कोसळण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. पॅट्रिशियाने सांगितले की, आजचा दिवस लोकशाहीसाठी (Democracy) खेद व्यक्त करायला लावणार आहे. कारण संसद हे आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ असते. आगीमुळे काही भाग पडण्याचीही शक्यता आहे.

आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफॉस आणि देशातील इतर अनेक प्रमुख नेते केपटाऊनमध्ये होते. उष्णतेमुळे इमारतींचे काही जुने भाग कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

शिवाय, महापौरांच्या सुरक्षा समितीचे सदस्य जेपी स्मिथ यांनी सांगितले की, आगीमुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. आग लवकर आटोक्यात न आणल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com