Sri Lanka: पोटाची खळगी भरण्यासाठी श्रीलंकन महिलांना करावी लागतेय देहविक्री

Sri Lanka News: श्रीलंकेतील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तिथल्या आर्थिक परिस्थितीने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांना देहविक्री करावी लागत आहे. यावरुन तुम्हाला श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येईल. एका अहवालात असे म्हटले आहे की, अनेक शहरांमध्ये लोकांकडे अन्न आणि औषधांसाठी पैसे नाहीत. दरम्यान, तिथे वेश्याव्यवसाय झपाट्याने वाढला असून महिलांना जाणीवपूर्वक या उद्योगात ढकलले जात आहे.

खरं तर, श्रीलंकन ​​दैनिक द मॉर्निंगने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, कोलंबोसारख्या शहरात महिला (Women) स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सेक्स वर्कर बनल्या आहेत. स्पा सेंटर्सचे रुपांतर तात्पुरत्या वेश्यालयांमध्ये झाले असून ते रोखणारे कोणीही नाही. याचे एक कारण म्हणजे स्वत: महिलाही दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून बळजबरीने यात सामील होत आहेत.

Sri Lanka
Sri Lanka Crisis: राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतुन साजिथ प्रेमदासा यांची माघार घेतली

दुसरीकडे, तेथील सेक्स इंडस्ट्रीत वाढ झाली आहे. या अहवालानुसार, वस्त्रोद्योगात नोकरी करणाऱ्या महिला नोकरी गमावण्याच्या भीतीने पर्यायी रोजगार (Employment) म्हणून वेश्याव्यवसायाकडे वळत आहेत. एका सेक्स वर्करचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, या क्षणी आम्ही सर्वोत्तम पर्याय म्हणून या व्यवसायाकडे पाहत आहोत. आमचा कल या दिशेने वाढला आहे. निदान यातून तरी खायला मिळेल.

Sri Lanka
Sri Lanka: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

तसेच, या महिलेने असेही सांगितले की, पूर्वी जेवढी कमाई एका महिन्यात होत होती, तेवढीच आमची कमाई एक-दोन दिवसांत होत आहे. इतकेच नाही तर, द टेलिग्राफने आणखी एका अहवालात या वर्षी जानेवारीपासून कोलंबोमध्ये (Colombo) सेक्स वर्कमध्ये गुंतलेल्या महिलांच्या संख्येत तीस टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे वृत्त दिले आहे. या स्त्रिया कोलंबोच्या दुर्गम भागातील आहेत, ज्यांनी पूर्वी वस्त्रो उद्योगात काम केले होते.

शिवाय, महिलांना हे सर्व बळजबरीने करायला लावले जात असल्याचेही कुठेतरी दिसून आले आहे. श्रीलंकेत (Sri Lanka) वेश्याव्यवसायाला कायदेशीर बंदी असताना हे सर्व घडत आहे. श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे. लोक उपासमारीचे बळी ठरत आहेत. फळे आणि भाज्यांचे भाव इतके वाढले आहेत की, सामान्य माणसाला ते विकत घेणे जवळपास अशक्य झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com