श्रीलंकेचा चीनला दणका; कोरोनाची लस ठेवली 'होल्ड'वर!

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

श्रीलंकेने चीनच्या ड्रॅगनला चांगलाच दणका दिला आहे. श्रीलंकन सरकारने चिनी बनावटीच्या कोरोनावरील लसीला नाकारत भारतीय बनावटीच्या ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका या लसीचा वापर देशातील जनतेसाठी करणार असल्याचे म्हटले आहे.

श्रीलंकेने चीनच्या ड्रॅगनला चांगलाच दणका दिला आहे. श्रीलंकन सरकारने चिनी बनावटीच्या कोरोनावरील लसीला नाकारत भारतीय बनावटीच्या ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका या लसीचा वापर देशातील जनतेसाठी करणार असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकन सरकारच्या प्रवक्त्यानी आज याबाबतची माहिती दिली असून, यात कोरोनावरील चीनने विकसित केलेली सिनोफर्मच्या लसीला होल्डवर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच देशातील 14 दशलक्ष जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी भारतात विकसित झालेली ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका लसच वापरणार असल्याचे नमूद केले आहे. 

तसेच सह-प्रवक्ते डॉ. रमेश पाथिराना यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, चीनने विकसित केलेली लस सिनोफर्मच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. याशिवाय चीनच्या या लसीबद्दल अधिक माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त, डॉ. रमेश पाथिराना यांनी श्रीलंका हा भारतात विकसित करण्यात आलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड या लसीवरच अवलंबून असल्याचे नमूद केले. त्यानंतर माध्यमाला दिलेल्या माहितीत डॉ. रमेश पाथिराना यांनी, सध्याच्या घडीला भारतात विकसित करण्यात आलेल्या लसीसोबतच जाणार असल्याचे म्हणत, चिनी लस निर्मात्यांकडून कागदपत्रे मिळाल्यानंतर लसीच्या नोंदीचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. 

'पंतप्रधान मोदींचे WHO ने मानले आभार'

यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने देखील (डब्ल्यूएचओ) चीनने विकसित केलेली कोरोना विरुद्धची लस मंजूर केली नसल्यामुळे सायनोफर्म लसीची नोंदणी करण्यास वेळ लागणार असल्याचे आणि यावर पुनरावलोकन चालू असल्याचे डॉ. रमेश पाथिराना यांनी सांगितले आहे. शिवाय, रशियाने तयार केलेली लस स्पुटनिक व्हीला देखील मान्यता देण्यात आली नसल्याचे माध्यमाकडून मिळालेल्या माहितीत समजते. आणि त्यामुळे श्रीलंकेला कोरोना विरुद्धच्या लसीसाठी भारतावरच अवलंबून रहावे लागणार आहे. श्रीलंकेच्या सरकारने भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लसींच्या 10 दशलक्ष डोससाठी 52.5 दशलक्ष डॉलर्सच्या कराराला मान्यता दिली असल्याची माहिती एका माध्यमाने दिली आहे.   

दरम्यान, श्रीलंकेपूर्वी देखील काही देशांनी चीनच्या लसीवर चिंता व्यक्त केली होती. ब्राझीलच्या सरकराने नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात फायझर-बायोएन्टेक  आणि मॉडर्ना यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसींपेक्षा चीन निर्मित सिनोव्हॅक लस फारच कमी प्रभावी असल्याचे म्हटले होते. याशिवाय ब्राझीलने घेतलेल्या चाचण्यांमध्ये चिन निर्मित लसची कार्यक्षमता 50.38 टक्केच असल्याचे निदर्शनात समोर आले होते.    

संबंधित बातम्या