Sri Lanka Crisis: 21 व्या घटनादुरुस्तीमुळे अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा, वाचा संपूर्ण प्रकरण

आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे (Basil Rajapaksa) यांनी आपल्या संसदीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Sri Lanka Crisis: 21 व्या घटनादुरुस्तीमुळे अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा, वाचा संपूर्ण प्रकरण
Former Sri Lankan Finance Minister Basil RajapaksaDainik Gomantak

आर्थिक संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी आपल्या संसदीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचे ते धाकटे भाऊ आहेत. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना आर्थिक संकटाचा सामना करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल प्रचंड जनक्षोभामुळे गेल्या महिन्यात राजीनामा द्यावा लागला होता.

पत्रकारांशी बोलताना बासिल म्हणाले की, मी श्रीलंका पोदुजाना पेरामुना पार्टी (SLPP) ला योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यास सांगितले असून माझ्या जागेचा राजीनामा दिला आहे.

Former Sri Lankan Finance Minister Basil Rajapaksa
Sri Lanka Crisis: रामायण फेम 'अशोक वाटिका' आर्थिक संकटात

बासिल राजपक्षे यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे

दुहेरी नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तींना सर्वोच्च नागरी पद धारण करण्यापासून रोखणारी 21 वी घटनादुरुस्ती श्रीलंकेच्या संसदेत सादर केली जाणार आहे. या घटनादुरुस्तीमुळे बासिल राजपक्षे यांनी राजीनामा देणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. ते श्रीलंका आणि अमेरिकेचा नागरिक आहेत.

Former Sri Lankan Finance Minister Basil Rajapaksa
Sri Lanka Crisis: महिंदा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र!

21वी घटनादुरुस्ती कायदा आणला जाणार आहे

विशेष म्हणजे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत (Sri Lanka) अलीकडेच सत्तापरिवर्तन झाले आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी गेल्या महिन्यात मोठ्या जनक्षोभानंतर पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. आता श्रीलंकेची संसद संविधानात प्रस्तावित 21वी दुरुस्ती (21A) आणणार आहे. 21A चे उद्दिष्ट दुहेरी नागरिकत्व असलेल्या नागरिकांना इतर सुधारणांसह सार्वजनिक पदासाठी निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणे आहे.

Former Sri Lankan Finance Minister Basil Rajapaksa
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे पुन्हा होऊ शकतात पंतप्रधान, संसदेत एकच जागा

4 एप्रिल रोजी पदावरुन बडतर्फ करण्यात आले

बासिल राजपक्षे यांना 4 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांनी श्रीलंकेचे अर्थमंत्री पदावरुन हटवले होते. देशातील आर्थिक संकटाला ते अंशतः जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र, बासिल राजपक्षे यांनी आर्थिक संकटास आपण जबाबदार नसल्याचे सांगितले. बेलआउटसाठी देशाने फार पूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) जायला हवे होते, असे ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com