
श्रीलंकेच्या (Sri Lanka) गॅले फेस भागात संघर्ष सुरू झाल्यानंतर, श्रीलंकेने कोलंबोच्या पश्चिम प्रांतात पुढील सूचना मिळेपर्यंत तत्काळ प्रभावाने पोलीस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गाले फेस येथे आलेले विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा आणि समगी जन बालवेगया खासदारांच्या गटावर विरोधकांच्या एका गटाने हल्ला केला होता. कायदा व सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती पाहता त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. (Sri Lanka Fight in Galle Face area Police used water cannons)
शिवाय, गॅले फेस ग्रीन येथे झालेल्या चकमकीदरम्यान जखमी झालेल्या नऊ जणांना कोलंबो येथील राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) चे समर्थक देखील गॅले फेस परिसरात घुसले आणि सरकारविरोधी निदर्शकांशी संघर्ष केला असल्याचे सांगितले जात आहे.
चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर करण्यात आल आहे. संकटग्रस्त श्रीलंकेने शुक्रवारी पाच आठवड्यांत दुसऱ्यांदा बाह्य कर्जाबाबत संप आणि निषेध केल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.
दरम्यान, श्रीलंका अन्न आणि विजेच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे, ज्यामुळे देशाला त्याच्या शेजाऱ्यांकडून मदत घेण्यास भाग पाडण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती उद्भवण्यामागे कोविड-19 (Covid-19) साथीच्या आजारादरम्यान पर्यटनावरील बंदोबस्तामुळे निर्माण झालेल्या परकीय चलनाच्या कमतरतेमुळे आहे. देश पुरेसे इंधन आणि गॅस खरेदी करू शकत नाहीये, तर लोक मूलभूत सुविधांपासूनही वंचित असल्याचे चित्र आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.