श्रीलंकेचे नवे पंतप्रधान भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यास उत्सुक

श्रीलंकेच्या नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
श्रीलंकेचे नवे पंतप्रधान भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यास उत्सुक
Ranil Wickremesinghe PM Narendra ModiTwitter

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी पदभार स्विकारला. त्यांच्या कार्यकाळात भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यास ते उत्सुक आहेत आणि त्यांनी श्रीलंकेला आर्थिक मदत केल्याबद्दल भारताचे आभार व्यक्त केले. श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटातून जात आहे. विक्रमसिंघे 73 वर्षाचे असून गुरुवारी श्रीलंकेचे 26 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (Sri Lanka Crisis)

देशाची कर्जबाजारी अर्थव्यवस्था स्थिर करणे आणि राजकीय गोंधळ हे त्यांच्यासमोर असलेले मोठे आव्हान आहे. "मला भारताशी जवळचे संबंध हवे आहेत आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे त्यासाठी आभार मानू इच्छितो," शपथ घेतल्यानंतर भारताने श्रीलंकेला दिलेल्या आर्थिक मदतीचा संदर्भ देत विक्रमसिंघे बोलत होते.

श्रीलंकेच्या नव्या सरकारबद्दल आशावादी

भारताने या वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेला तीन अब्ज डॉलरहून अधिक कर्ज दिले आहे. भारताने गुरुवारी सांगितले की ते लोकशाही प्रक्रियेनुसार स्थापन झालेल्या नवीन श्रीलंका सरकारसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहे आणि श्रीलंकेतील लोकांसाठी भारत सदैव मदत करण्यास वचनबद्ध राहिल.

Ranil Wickremesinghe PM Narendra Modi
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे पुन्हा होऊ शकतात पंतप्रधान, संसदेत एकच जागा

युनायटेड नॅशनल पार्टी (UNP) चे 73 वर्षीय नेते विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी देशाच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. सरकारविरोधी निदर्शकांवर त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यांवरून हिंसाचार उसळल्यानंतर महिंदा यांनी राजीनामा दिला होता.

या हल्ल्यानंतर राजपक्षे निष्ठावंतांविरुद्ध व्यापक हिंसाचार झाला, ज्यामध्ये नऊ लोक मरण पावले आणि 200 हून अधिक लोकं जखमी झाले. त्यांचे लक्ष आर्थिक संकटाशी सामना करण्यावर आहे. मला ही समस्या सोडवायची आहे जेणेकरून देशातील पेट्रोल, डिझेल आणि विजेचा पुरवठा सुरळीत करता येईल,असे विक्रमसिंघे म्हणाले.

1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. 225 सदस्यांच्या संसदेत केवळ एकच जागा असल्याने त्यांचे पंतप्रधानपद कायम राहू शकेल का, असे विचारले असता ते म्हणाले, "जेव्हा बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मी ते सिद्ध करेन. आणि मी हाती घेतलेले काम पुर्ण करेन."

देशभरातील निदर्शनांचा संदर्भ देताना ते म्हणाले की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सचिवालयाजवळ एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेले मुख्य आंदोलन सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. आंदोलकांची इच्छा असेल तर मी त्यांच्याशी बोलेन, असे समयसूचक आणि देशात शांतता निर्माण होईल असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिले.

नव्या पंतप्रधानांनाही विरोध

  • राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोध होण्याची भीती वाटते का?

विक्रमसिंघे म्हणाले की आम्ही त्यांचा सामना करू. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP), विरोधी पक्ष समगी जना बालवेगया (SJB) आणि इतर अनेकांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांच्या सदस्यांनी संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विक्रमसिंघे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Ranil Wickremesinghe PM Narendra Modi
Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे बनले नवे पंतप्रधान

मात्र, नवे पंतप्रधान म्हणून विक्रमसिंघे यांच्या नियुक्तीला अनेक वर्ग विरोध करत आहेत. JVP (जनता विमुक्ती पेरामुना) आणि तमिळ नॅशनल अलायन्सने दावा केला की त्यांची नियुक्ती घटनाबाह्य होती. माजी अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्या श्रीलंका फ्रीडम पार्टीने शुक्रवारी सकाळी निर्णय घेण्यासाठी त्यांची केंद्रीय समिती बैठक घेणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.