श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, हिंसक निदर्शनांदरम्यान मोठा निर्णय

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या राजधानीत पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, हिंसक निदर्शनांदरम्यान मोठा निर्णय
Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa News | Sri Lanka News | Sri Lanka PM NewsDainik Gomantak

Mahinda Rajapaksa Resigns : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान महिंदा राजपक्षे यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत दुसऱ्यांदा आणीबाणी लागू केल्यानंतर देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. सोमवारी राष्ट्रपती भवनाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर सरकार समर्थकांनी हल्ला केला. (Sri Lanka News)

दरम्यान, पोलीसांनी राजपाक्षे सरकारविरोधात घोषाणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. दुसरीकडे, विरोधी पक्षनेत्यावर सरकार समर्थकांकडून हल्ला झाल्याचा आरोप आहे. गोटाबाया राजपाक्षे शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी आले होते. (Sri Lanka PM Resigns)

Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa News | Sri Lanka News | Sri Lanka PM News
Sri Lanka Crisis: कोलंबोमध्ये हिंसक संघर्षानंतर संचारबंदी लागू, 20 जण जखमी

पूर्वीच्या अहवालानुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे यांनी कबूल केले आहे की, ''नागरिकांच्या निषेधानंतर देशातील राजकीय आणि आर्थिक संकटावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. या संकटाचा देशाच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कारखाने बंद होण्यापूर्वीच देशावरील आर्थिक बोजा वाढला होता.''

Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa News | Sri Lanka News | Sri Lanka PM News
Sri Lanka: इस्टर स्फोटानंतर मुस्लिम समुदाय बनला होता 'खलनायक', आता...'

दुसरीकडे, राजकीय सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री प्रसन्ना रणतुंग, नल्का गोदाहेवा आणि रमेश पाथिराना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या महिंदा राजपाक्षे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

तथापि, सहकारी मंत्र्यांव्यतिरिक्त मंत्री विमलपुरा दिसानायके म्हणाले की, 'महिंदांचा राजीनामा देशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी निरुपयोगी ठरेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.