Monkey Business Sri Lanka China: श्रीलंका चीनला विकणार 1 लाख माकडे, कारण काय ? जाणून घ्या सविस्तर

चीनने 1000 प्राणिसंग्रहालयासाठी श्रीलंकेकडे माकडांची मागणी केली आहे.
Srilanka China
Srilanka ChinaDainik Gomantak

Monkey Business Sri Lanka China: आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका आपला खर्च कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे.

आता तेथील सरकार आपल्या टोक मकाक माकडांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी चीनची मदत घेणार आहे. श्रीलंकेचे कृषी मंत्री महिंद्र अमरवीरा यांनी ही माहिती दिली आहे.

चीनने 1000 प्राणिसंग्रहालयासाठी त्यांच्याकडे माकडांची मागणी केली आहे. यावर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या माध्यमातून चीनला एक लाख माकडे विकण्याची संपूर्ण योजना तयार केली जात आहे.

चीनला मकाक माकड देण्याआधीच श्रीलंकेच्या पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तानुसार, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने देशातील माकडांची गणना केली पाहिजे. माकडे खरेदी करण्याच्या चीनच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"चीनला ही माकडे का हवी आहेत, त्यांच्यावर काही संशोधन करायचे आहे का, ते खाण्याच्या उद्देशाने विकत घेतले जात आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे." असे पर्यावरण कार्यकर्ते जगथ गुणवर्देना यांनी एफपी या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

अर्थात, श्रीलंकेतील माकडे संरक्षित प्राण्यांच्या यादीत नाहीत, पण आंतरराष्ट्रीय रेड लिस्टमधील संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Srilanka China
Life on Mars: मंगळावर सापडले प्राचीन अवशेष! नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठवला 'पुरावा'

श्रीलंकेत माकडांच्या तीन प्रजाती आहेत. यापैकी टोक मकाक माकडांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. एका अहवालानुसार, श्रीलंकेत टोक मकाक माकडांची संख्या 20 ते 3 दशलक्ष दरम्यान आहे. जे तेथील अनेक समस्यांचे कारण बनत आहे.

यामुळे अलीकडच्या काळात श्रीलंकेने काही प्राण्यांना संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळले होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मारण्याची परवानगी मिळाली.

कृषिमंत्र्यांच्या मते, माकडे आणि गिलहरी दरवर्षी श्रीलंकेत 100 दशलक्ष नारळ नष्ट करतात. त्यामुळे त्यांचे सुमारे 157 कोटींचे नुकसान झाले आहे. ही माकडे शेतकऱ्यांची पिकेही खराब करतात. अशा स्थितीत धान्यही तिथे खराब होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com