Italian Government on LGBTQ: समलैगिंक जोडप्यांच्या मुलांची जन्मनोंदणी बंद करा; 'या' देशाने जारी केला आदेश

LGBTQ: समलैगिंक विवाहाला मान्यता दिली आहे.
LGBTQ Flag
LGBTQ Flag Dainik Gomantak

Italian Government on LGBTQ: इटलीच्या सरकारने मिलान शहराच्या मेअरला एक आदेश दिला आहे. समलैगिंक जोडप्याच्यामुलांची जन्मनोंदणी त्वरीत बंद करावी असे या आदेशात म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या आदेशानंतर मेअरने दिलेल्या आदेशाचे पालन करु परंतु समलैगिंक समुदायाच्या हक्कासाठी लढा देऊ असे म्हटले आहे. समलैगिंक पालक आणि त्यांची मुले यांना न्याय मिळावा यासाठी राजनैतिक लढा देऊ असे म्हटले आहे.

प्रधानमंत्री जियोर्जिया मेलोनी यांच्या आदेशानंतर इटलीमध्ये पून्हा एकदा वादविवाद सुरु झाले आहेत.

2016 मध्ये कैथोलिक आणि कंजर्वेटिव ग्रुप च्या विरोधात जाऊन समलैगिंक विवाहाला मान्यता दिली आहे.

समलैगिंक विवाहाला मान्यता दिल्यानंतरही सरोगसीचे प्रमाण वाढू नये म्हणून इटलीमध्ये अशा जोडप्यांना मूल दत्तक घेण्याविषयी कोणताही कायदाचा कमजोर आहे. याचे कारण म्हणजे इटलीमध्ये सरोगसीला अवैधमानले जाते.

LGBTQ Flag
Pakistan News: पाकिस्तानात राडा! इम्रान खान समर्थक अन् पोलिसांमध्ये हाणामारी

दरम्यान, प्रधानमंत्री जियोर्जिया मेलोनी हे पारंपारिक ख्रिश्चन धर्माच्या संरक्षणाला पाठिंबा देणारे आहेत. त्यांनी एलजीबीटीक्यू लॉबीची निंदा केली होती. मात्र एलजीबीटीक्यू समुदायाने त्यांना जोरदार विरोध केला होता.

आता इटलीच्या प्रधानमंत्र्याच्या या निर्णयानंतर एलजीबीटी( LGBTQ) समुदाय काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com