Earthquake: दक्षिण-पूर्व तैवानमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake in Southeast Taiwan: दक्षिण-पूर्व तैवानमध्ये पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे.
Earthquake
EarthquakeDainik Gomantak

Earthquake In Southeast Taiwan: दक्षिण-पूर्व तैवानमध्ये पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 एवढी होती. दक्षिण-पश्चिम तैवानमधील ताईतुंग शहराजवळ युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला. USGS ही जगभरातील भूकंपाच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांपैकी एक मानली जाते. ताईतुंग शहरापासून 27 किमी अंतरावर भूकंप झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, USGS ने सांगितले की, 'भूकंपाचा धक्का रात्री 9:30 (1330 GMT) नंतर, ताईतुंग या शहराच्या उत्तरेस सुमारे 50 किलोमीटरवर जाणवला.' स्थानिक माध्यमांनी सुरुवातीला भूकंपामुळे (Earthquake) कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त दिले नाही. तैवानच्या सेंट्रल वेदर ब्युरोने त्याची तीव्रता 6.4 इतकी कमी ठेवली, परंतु ती 7.3 किमी कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Earthquake
Earthquake: अफगाणिस्तानपासून नोएडपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के

तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत

तैवान (Taiwan) दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ असल्याने नियमितपणे भूकंपाचे धक्के बसतात. 6.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे काही भूकंप प्राणघातक ठरु शकतात. परंतु हा भूकंप कुठे आणि कोणत्या खोलीवर झाला यावर बरेच काही अवलंबून असते.

Earthquake
Earthquake: जपान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले, त्सुनामीचा इशारा

22 मार्च 2022 रोजीही भूकंप झाला होता

यापूर्वी, 22 मार्च रोजी तैपेईमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. या धक्क्यांमुळे तिथल्या इमारती हादरल्या होत्या. हा भूकंप 6.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती. भूकंपाचा केंद्रबिंदू 30.6 किमी (19 मैल) वर होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com