पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके

पाकिस्तानमध्ये (pakistan) आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके
Strong earthquake tremors in PakistanDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये (pakistan) आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची (Pakistan earthquake) तीव्रता 6.0 होती. या काळात किमान 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दक्षिण भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचे झटके आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील हरनईच्या 14 किमी NNE वर जाणवले.

Strong earthquake tremors in Pakistan
इस्त्रायलमध्ये सापडले 2700 वर्ष जुने लक्झरी 'टॉयलेट'

अनेक घरांचे नुकसान

अहवालानुसार, शक्तिशाली भूकंपाच्या हादऱ्यांमुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता खूप मजबूत होती आणि जवळपासच्या अनेक जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती आहे. याआधी 23 जून 2021 रोजी इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या मते, राजधानी इस्लामाबादच्या 146 किमी डब्ल्यूएसडब्ल्यूमध्ये संध्याकाळी 6.39 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 मोजण्यात आली.

13 फेब्रुवारी 2021 रोजी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.4 मोजण्यात आली. पाकिस्तानच्या नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरनुसार (National Seismic Monitoring Centre), भूकंपाचा केंद्रबिंदू ताजिकिस्तानमध्ये 80 किमी खोलीवर होता. इस्लामाबाद, खैबर पख्तूनख्वा आणि पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. जोरदार भूकंपानंतरही येथे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.

भूकंपानंतर सोशल मीडियावर अनेक फोटोज समोर आली आहेत. भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत. शक्तिशाली भूकंपानंतर पाकिस्तानमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com