Success Story: तुरुंगात जन्म, गरिबी सोसली, आता 'ही' 18 वर्षांची तरुणी हार्वर्डमध्ये पोहोचली; वाचा संघर्षमय कहाणी

Aurora Skye Kastner: तुरुंगात जन्मलेली मुलगी. जिला आईचे प्रेम मिळाले नाही. वडिलांनी तिचे पालनपोषण केले.
Aurora Skye Kastner
Aurora Skye KastnerDainik Gomantak

Jail to Harvard Girl Success Story: तुरुंगात जन्मलेली मुलगी. जिला आईचे प्रेम मिळाले नाही. वडिलांनी तिचे पालनपोषण केले. लहानपणापासून सर्व प्रकारच्या समस्यांचा सामना केला. पण अभ्यास सोडला नाही.

आज ती हार्वर्ड विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेऊन तिचे स्वप्न साकार करणार आहे. तिने हार्वर्डमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली आहे. चला तर मग जाणून घेऊया 18 वर्षीय अरोरा स्काय कास्टनरच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी...

Nyt च्या रिपोर्टनुसार, कास्टनर ही अमेरिकेतील (America) टेक्सासची रहिवासी आहे. तिचा जन्म झाला तेव्हा तिची आई तुरुंगात शिक्षा भोगत होती.

अशा परिस्थितीत वडिलांनी तिला एकट्याने वाढवण्याचा निर्णय घेतला. कास्टनर पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती. प्रत्येक वेळी ती शाळेत पहिली आली. कॉलेजमध्येही (College) तिने टॉप केले. आता ती हार्वर्डमध्ये शिकणार आहे. येथे ती कायद्याची पदवी मिळवणार आहे.

Aurora Skye Kastner
Diwali In New York: दिवाळीला मिळणार सरकारी सुट्टी ! न्यूयॉर्क विधानसभेत प्रस्ताव

दरम्यान, कास्टनरच्या या प्रवासात वडिलांसोबत मोना हॅम्बी नावाच्या महिलेचीही महत्त्वाची भूमिका होती. कास्टनरचा जन्म हालाखीच्या परिस्थीतीत झाला. मात्र तिला हार्वर्डला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हॅम्बीने खूप मदत केली. कास्टनरला प्राथमिक शाळेदरम्यान हॅम्बी तिला भेटली.

हॅम्बी सांगते की, कास्टनर अभ्यासात खूप तल्लक होती. शिक्षकांच्या प्रश्नांना ती चुटकीसरशी उत्तरे देत असे. हार्वर्डला जाण्याचे तिचे स्वप्न असल्याचे मला समजल्यावर मी तिला सर्वकाही मदत देऊ केली. मग तिला नोट्स देणे, परीक्षेची तयारी करुन घेणे, कोचिंगमध्ये मदत करणे इ.

Aurora Skye Kastner
America Visa Hike: अमेरिकेत 'या' तारखेपासून शिक्षण घेणे, फिरायला जाणे महागणार

दुसरीकडे, कास्टनरने हार्वर्डला पाठवलेल्या अर्जाच्या पत्राचीही चर्चा होत आहे. यात तिने सुरुवातीलाच लिहिले होते की, माझा जन्म तुरुंगात झाला… सध्या ती शिष्यवृत्तीवर हार्वर्डमध्ये शिक्षण पूर्ण करणार आहे. तिचा अभ्यासक्रम तीन वर्षांत पूर्ण होईल. यानंतरही ती आपला अभ्यास सुरु ठेवणार आहे.

तसेच, कास्टनर अत्तापर्यंत तिच्या आईशी फक्त एक किंवा दोनदा बोलली आहे. ती म्हणते की, मी ज्या वातावरणात वाढले ते खूप वेगळे होते. पण यात वाईट काहीच नाही. मी प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेले. वडील आणि मार्गदर्शक मोना हॅम्बी यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीने मला अधिक मजबूत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com