Suez Canal Blockage: सुएझमध्ये अडकलेल्या जहाजाची वाट मोकळी; 6 दिवसांनी झाली सुटका

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

आता एक चांगली बातमी अशी की, एव्हरग्रीन नावाचं जहाज सहा दिवसांनंतर आज सोमवारी सकाळी 9.30 वाजता सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आणि आता ते हळूहळू मार्गक्रमन करायला लागले आहे.

जगातील सर्वात व्यस्त व्यवसायी मार्ग असलेल्या, इजिप्तच्या सुएझ कालव्यात मंगळवार पासून जाम लागला होता. 23 मार्च ला चीनहून माल घेऊन जाणाऱ्या एव्हरग्रीन नावाचं व्यापारी जाहाज कालव्यात अडकल्याने  मोठी मालवाहू थांबली आणि जहाजांचा जाम झाला. गेल्या सहा दिवसांपासून सुएझ कालव्यात अडकलेल्या अवाढव्य अशा मालवाहतूक जहाजाने जगाची चिंता वाढवली होती. आता एक चांगली बातमी अशी की, हे जहाज सहा दिवसांनंतर आज सोमवारी सकाळी 9.30 वाजता सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आणि आता ते हळूहळू मार्गक्रमन करायला लागले आहे.

विशेष म्हणजे मंगळवारी शंभराहून अधिक जहाजे या मार्गातील जाममध्ये अडकली होती. या जहाजाला  25 भारतीय चालवित आहेत. सर्व भारतीय वाहनचालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तासाला 2800 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आणि आता परिस्थिती पुर्वव्रत होण्यासाठी पाच ते सात दिवस लागू शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत आशिया आणि युरोपमधील बहुतांश व्यापारावर परिणाम होणार अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Suez Canal Blockage: सुएझ कॅनॉल जॅमचा भारतालाही फटका? वाचा कोणकोणत्या गोष्टींवर होणार परिणाम 

मिळालेल्या माहितीनुसार पनामा ध्वज एव्हर ग्रीन या विशाल मालवाहू जहाजावर लावला आहे 193.3 किमी लांबीचा सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राबरोबर जोडते. मंगळवारी सकाळी सुवेझ बंदराच्या उत्तरेस कालवा ओलांडताना नियंत्रण गमावल्यानंतर हे जहाज सुईझ कालव्यात अडकले होते. 

दररोज हजारो छोटी-मोठी जहाजं या कालव्यामार्गे युरोप ते आशिया आणि आशिया पासून युरोपपर्यंत प्रवास करतात. बराच काळ हा मार्ग बंद पडल्यामुळे काही समुद्री जहाजांना आफ्रिका खंडातून युरोपला जावे लागली. याचा परिणाम जगभरातील पुरवठा साखळीवरही झाला. 

संबंधित बातम्या