'क्वाड' देशांकडून अग्नेय आशियातील देशांना एक अब्ज लसींचा पुरवठा

covid 1.jpg
covid 1.jpg

अग्नेय आशियातील (Southeast Asia) देशांना क्वाड देश (Quad country) एक अब्ज लसींचा (Vaccines) पुरवठा करणार आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून अद्याप कोरोनाचा प्रभाव ओसरला नाही.

भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia), जपान (Japan) आणि अमेरिका (America) या देशांनी क्वाड गटाची पहिली अभासी बैठक मार्च महिन्यात घेण्यात आली होती. आता या गटाने अग्नेय आशियातील देशांना एक अब्ज कोरोना लसी पुरवण्याचे ठरवले आहे. या लसींची निर्मीती भारतात करण्यात येणार होती मात्र त्याचवेळी भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागल्यामुळे भारताकडून लसी मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी 2022 पर्यंत क्वाड गटातील देश त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.  (Supply of one billion vaccines from Quad countries to Southeast Asian countries)

व्हाइट हाऊसचे भारत पॅसिफिक विभाग धोरण सल्लागार कुर्त कॅम्पबेल यांनी सांगितले, आम्ही भागीदार देशांशी चर्चा करत आहोत. भारताच्या मित्र देशांना कोरोना काळ कठीण आहे. सध्या अमेरिक भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून खासगी आणि सरकारी क्षेत्राचा याला पाठिंबा आहे. सरकारी गटांशी त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात आली असून 2022 पर्यंत ती लस उपलब्ध केली जाईल.

'सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटी' या वॉशिंग्टनमधील (Washington) गटाने आयोजित चर्चासत्रात सांगितले की, अग्नेय आशियातील देशांना कोरोना लस मिळवून देण्यासाठी कमी कालावधीत वेगाने प्रयत्न करावे लागणार आहेत. आशियातच नव्हे तर संपूर्ण जगातच कोरोना विषाणूचे नवनवे प्रकार येत असून धोका कायम आहे. मुखपट्टी, सामाजिक अंतर हे उपाय करुनही ते पुरेसे ठरताना दिसत नाही.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com