भारताकडून पॅलेस्टाईनचं समर्थन; इस्रायलमधील हिंसाचाराचा केला निषेध  

Support for Palestine from India Protests against violence in Israel
Support for Palestine from India Protests against violence in Israel

पॅलेस्टाईन (Palestine) आणि इस्त्रायलमधील (Israel) वाढत्या संघर्षामुळे संयुक्त राष्ट्रांमध्ये रविवारी प्रदिर्घ अशी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान भारतानं (India) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी भारतानं गाझा येथे होत असलेल्या (Gaza Strip) रॉकेट हल्ल्यामुळे हिंसाचाराचा (Violence) निषेध नोंदवला आहे. (Support for Palestine from India Protests against violence in Israel)

मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र संघात चर्चेदरम्यान,भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस तिरुमूर्ती(T.S.Tirumurti) यांनी भारताची भूमिका मांडली आहे. सध्या सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये मोठी हानी झाली आहे आणि विशेष म्हणजे या हिंसाचारामध्ये महिला आणि बालकांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  ''आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढणाऱ्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहोत.'' पूर्व जेरुसलेम आणि त्याच्या सभोवतालच्या सध्याच्या परिस्थीतीमध्ये एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन तिरुमूर्ती यांनी सुरक्षा समितीला केले आहे. हमासने केलेल्या रॉकेट हल्यामध्ये भारताच्या इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या सौम्या संतोष या भारतीय महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. शनिवारी सौम्या यांचे पार्थिव केरळमध्ये आणण्यात आले. या महिलेसह मृत्यूमुखी पडलेल्या इतर नागरिकांच्या निधनावर भारत शोक व्यक्त करत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघात राजदूतांनी सांगितले.

टी.एस तिरुमूर्ती यांनी दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याने थेट संवाद सुरु करण्यासाठी आणि विशेष म्हणजे त्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. पॅलेस्टाईनच्या मागण्यांना भारताचा पूर्णपणे पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या सिध्दांतानुसार या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. 

दरम्यान, जेरुसलेमला दरवर्षी भेट देणाऱ्या भारतीयांच्या मनामध्ये या शहराबद्दल एक विशेष स्थान आहे. ओल्ड सिटीमध्ये अल झिविय्या अल हिंदिया या भारतीय धर्मशाळेत एक महान भारतीय सुफी संत बाबा फरिद यांच्याशी संबंधित असल्याने त्याला एक ऐतिहाासिक महत्व आहे. भारताने ही धर्मशाळा पुन्हा एकदा नव्याने बांधली आहे. असं तिरुमूर्ती यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com