ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीला आता 'या' देशाने दिली स्थगिती  

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात झाली आहे. त्यामुळे जगात पुन्हा नवीन आशेचे किरण दिसून येत असतानाच आता नवीन परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात झाली आहे. त्यामुळे जगात पुन्हा नवीन आशेचे किरण दिसून येत असतानाच आता नवीन परिस्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस म्हणून विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याचे काही देशांच्या आरोग्य विभागांनी म्हटले होते. व त्यानंतर या लसींचा वापर तात्काळ थांवण्याचा निर्णय घेतला होता. या देशांच्या यादीत आता स्वीडनचा देखील समावेश झाला आहे. नुकतेच स्वीडनने देखील अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (Sweden has now suspended the use of the Oxford-AstraZeneca vaccine)

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या लसीचा वेगवेगळ्या देशातील काही लोकांवर गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले होते. आणि त्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड, नेदरलँड, आइसलँड, ऑस्ट्रिया, इटली आणि फ्रान्स या देशांनी काही काळासाठी अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या वापरला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता स्वीडनने सुद्धा देशातील लसीकरण मोहिमेत अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या वापरला बंदी घातली आहे. यापूर्वी डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड, नेदरलँड आणि आइसलँड मध्ये अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या लोकांच्या रक्तामध्ये गाठी झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून समोर आले होते. तर या लसीच्या परिणामांमुळे झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्याचे आदेश देऊन ऑस्ट्रियाने सुद्धा ही लस थांबविण्याचा निर्णय घेतला होता. (Sweden)

अमेरिकेत स्पा मध्ये झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू 

याशिवाय, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी देखील युरोपियन मेडिसीन एजन्सीचा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सुरक्षेबाबतचा निर्णय प्रलंबित असेपर्यंत या लसीच्या वापरला स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले होते. तर इटलीमध्ये ५७ वर्षीय व्यक्तीची लस घेतल्यानंतर मृत्यूची घटना समोर आली होती. व या घटनेनंतर आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या भीतीबद्दल सावधगिरीचा उपाय म्हणून अ‍ॅस्ट्राझेनेका लसीवर इटलीने रोख लावली होती. 
              
(Oxford-AstraZeneca vaccine) काही देशांमध्ये रक्तस्त्राव, रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेटची संख्या कमी होण्याचे निदर्शनास आल्यानंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीचा लसीकरणाच्या मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर आइसलँड आणि बल्गेरिया यांनी देखील अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला रोखण्याचा निर्णय घेतला होता. या पाठोपाठ आयर्लंड आणि नेदरलँडने देखील अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला थांबविले होते. मात्र याउलट जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या वापरला न थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

किम जोंग यांच्या बहिणीची अमोरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना धमकी   

आशिया आणि युरोपातील काही राष्ट्रांनी अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा वापर करण्याचे थांबवल्या नंतर जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाला न थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय युरोपियन मेडिसिनने सुद्धा याबद्दल स्पष्टीकरण देताना, युरोपीयन अधिकाऱ्यांनी अधिकच्या चाचण्या घेतल्या असून, या चाचण्यांमधून कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. तर लोकांमध्ये निर्माण झालेली भीती घालवण्यासाठी मासिक अहवाल पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या ईएमए मध्ये प्रसिद्ध केला जाणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, तसेच या लसींच्या परिणामांबद्दल केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या दाव्यांचे पुरावे नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

दरम्यान, (Sweden has now suspended the use of the Oxford-AstraZeneca vaccine) लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी होण्याच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅस्ट्राझेनेकाने दिले होते. अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून युरोपियन युनियन आणि युकेमधील लसीकरण झालेल्या 17 दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यावरुन त्यांनी या संबंधीचा निष्कर्ष काढला आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने म्हटले आहे की, युरोपीयन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानुसार चाचण्यांमध्य़े कोणतीही चिंता करण्याचे कारण दिसून आले नाही. मासिक अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये EMA वेबसाइटवर लोकांच्या खात्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहाय्याने अ‍ॅस्ट्राझेनेका लस तयार करण्यात आली आहे. ही लस युरोपियन युनियन आणि बऱ्याच देशांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत अमेरिकेने अ‍ॅस्ट्राझेनेकाला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

संबंधित बातम्या