व्हिसाच्या प्रस्तावामुळे भारतीयांवर पुन्हा टांगती तलवार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

व्हिसावरून अमेरिकेच्या धोरणातील संभाव्य बदलामुळे भारतीयांच्या डोक्यावर पुन्हा टांगती तलवार आली आहे. विशेष नोकरीसाठी एच-१बी व्हिसाबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास हजारो भारतीयांना फटका बसू शकतो.

वॉशिंग्टन :  व्हिसावरून अमेरिकेच्या धोरणातील संभाव्य बदलामुळे भारतीयांच्या डोक्यावर पुन्हा टांगती तलवार आली आहे. विशेष नोकरीसाठी एच-१बी व्हिसाबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास हजारो भारतीयांना फटका बसू शकतो.

कौशल्याच्या कामासाठी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी पर्यायी संधी बी-१ व्हिसामुळे मिळते असा समज दूर होईल. दरवर्षी आठ हजार परदेशी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. परराष्ट्र खात्याने एच-१ बी व्हिसाच्या विशेष व्यवसायाशी निगडित तात्पुरता बिझनेस व्हिसा मंजूर करायचा नाही असा प्रस्ताव तयार केला आहे. अशा व्हिसामुळे अनेक व्यावसायिक तंत्रज्ञ कमी कालावधीसाठी अमेरिकेत राहून कामाच्या ठिकाणी प्रकल्प पूर्ण करायचे. अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संसदेने लागू केलेल्या बिगर-स्थलांतरित वर्गवारीच्या निर्बंध आणि अटींना बगल हे कर्मचारी आणि त्यांना नेमणाऱ्या कंपन्या बगल देण्याची शक्यता निर्माण होईल.

दरम्यान, परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, कामगारांच्या वेतनावरील खर्च वाढत असल्यामुळे अमेरिकी वास्तुविशारद कंपन्या आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना काढून तशीच सेवा परदेशी कंपनीकडून मिळवण्याचा विचार करू शकते. 

संबंधित बातम्या