चीन करतोय तैवानवर हल्ल्याची तयारी,जग दुसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर?

तैवानच्या स्वयंशासित बेटाच्या संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली असून बीजिंगशी सर्वव्यापी युद्धाचा इशाराही दिला असल्याचे समजत आहे (Taiwan-China Clash).
चीन करतोय तैवानवर हल्ल्याची तयारी,जग दुसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर?
Taiwan-China Clash: China ready for attack on TaiwanDainik Gomantak

चीन (China) 2025 पर्यंत तैवानवर (Taiwan) पूर्णपणे हल्ला करण्यास तयार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे . तैवानच्या स्वयंशासित बेटाच्या संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली असून बीजिंगशी सर्वव्यापी युद्धाचा इशाराही दिला असल्याचे समजत आहे (Taiwan-China Clash). संरक्षण मंत्री (Defense Minister ) चिउ कुओ-चेंग यांनी संसदेत 8.6 अब्ज डॉलर्सच्या नवीन लष्करी खर्चाचा आवहाल सादर करताना म्हटले की बीजिंगमध्ये त्वरित हल्ला करण्याची क्षमता आहे. पण त्याला हल्ल्याचा आदेश देण्यापूर्वी खर्च कमी करायचा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांपासून चीन आणि तैवान यांच्यातील तणाव अधिकच वाढताना दिसत आहे. (Taiwan-China Clash: China ready for attack on Taiwan)

यावर अधिक माहिती देताना चिउ कुओ-चेंग म्हणाले, 2025 पर्यंत चीन युद्धातील खर्च आणि नुकसान कमी करेल. ते म्हणाले की चीनशी सध्याची अडचण अतिशय गंभीर आहे, कारण त्यांनी 40 वर्षांत असे पाहिले नाही. तैवान सामुद्रधुनीमध्ये 'मिसफायर' होण्याचा धोका खूप जास्त झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले आहे आणि तैवान कराराचे पालन करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केल्याचे सांगितले आहे.

बायडन आणि जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्यापासून चीनने तैवानच्या बेटाभोवती लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. गेल्या आठवड्यात चीनने आपल्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने तैवानच्या दिशेने 150 हून अधिक लढाऊ विमाने उडवली होती . त्याचवेळी, चिनी मीडिया इशारा देत आहे की तैवानला ताब्यात घ्यायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे जगात तिसरे महायुद्ध कधीही सुरू होऊ शकते. तथापि, त्याला बीजिंगच्या कारवाईचे उत्तर देखील मिळाले आहे.

Taiwan-China Clash: China ready for  attack on Taiwan
Taiwan-China Clash: तैवान चा 'ड्रॅगन' ला इशारा

त्याच वेळी याठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात येते की जो बायडन 'तैवान संबंध कायदा' बद्दल बोलत होते, ज्या अंतर्गत अमेरिकेने बीजिंगशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली होती कारण तैवानचे भविष्य शांततापूर्ण आहे. या कायद्यांतर्गत अमेरिका तैवानला त्याच्या संरक्षणासाठी शस्त्रेही पुरवते. त्याच वेळी, या कायद्याअंतर्गत, वॉशिंग्टन देखील ओळखतो की हे बेट बीजिंगच्या 'वन चायना'चा भाग आहे.त्याचबरोबर बायडन यांची जिनपिंग यांच्याशी शेवटची चर्चा 9 सप्टेंबर रोजी झाली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com