शेवटच्या श्वासापर्यंत चीनशी लढणार: तैवान

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

तैवान आणि चीन यांच्यातील वैर हे उघड आहे. एकीकडे चीन (china) तैवानवर आपला अधिकार सांगत असताना दुसरीकडे तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. त्यामुळे हे दोनही देश एकमेकांविरोधात तीव्र वक्तव्य तसेच एकमेकांना धमकावत असतात.

तैवान आणि चीन यांच्यातील वैर हे उघड आहे. एकीकडे चीन (china) तैवानवर आपला अधिकार सांगत असताना दुसरीकडे तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. त्यामुळे हे दोनही देश एकमेकांविरोधात तीव्र वक्तव्य तसेच एकमेकांना धमकावत असतात. चीनच्या हुकूमशाही वृत्तीने त्रस्त असलेल्या तैवानने अलीकडेच पुन्हा एकदा चीनने तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता तैवानच्या भूमीवर आक्रमण केल्यास तैवान शांत बसणार नाही अशी ठोस भूमिका देखील तैवानने घेतली आहे. याशिवाय, तैवान चीनला चोख प्रत्युत्तर द्यायला तयार असून, शेवटपर्यंत लढायला तयार असल्याचे गर्जना तैवानने केली आहे. बुधवारी चीनच्या लढाऊ विमानाने तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याने तैवान चीनवर चांगलाच भडकला आहे. (Taiwan will fight China to the last breath)

‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकुट हिसकावणाऱ्या परिक्षकाला अटक

तैवान याबाबत अधिक माहिती जाहीर करताना, यापूर्वी देखील चीनच्या विमानांनी हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यानंतर अनेकदा चीनला इशारा सुद्धा देण्यात आल्याचे तैवानने सांगितले. परंतु यानंतरही चीनच्या वृत्तीत कोणताही बदल झालेला नसल्याचे तैवानने पुढे नमूद केले. त्यानंतर, चिनी लढाऊ विमाने जवळजवळ दररोजच तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत असल्याचं तैवानने म्हटले आहे. सोमवारी चीनने तैवानजवळ एक सराव करीत असल्याचे वृत्त दिले होते, यानंतर चीनची 15 विमाने आणि 12 लढाऊ विमानांनी आपल्या हवाई डिफेन्स आयडेंटीफिकेशन झोनमध्ये प्रवेश केल्याची माहिती तैवानने दिली होती. यामध्ये अँटी सबमरीन विमानांचा देखील समावेश होता. तैवान आणि फिलिपिन्समधील बाशी चॅनेल त्याचे स्थान होते.

यानंतर, चीनच्या विमानांनी हवाईहद्दीत प्रवेश केल्यानंतर तैवानने चीनच्या विमानांना इशारा देण्यासाठी आपली विमानेही पाठविली होती. यावर, अमेरिकन (USA) नौदलाने आपले गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर जॉन एस. मैक्केन नियमित पाळत ठेवून तैवान समुद्रातून गेले असल्याचे म्हटले आहे. तर, चीनने आपल्या  विमानांनी अमेरिकेच्या डिस्ट्रॉयरचा पाठलाग केला आणि त्यावर लक्ष ठेवले असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त, चीनने या भागात अमेरिकन युद्धनौका पाठविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  

अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की

अमेरिकेची युद्धनौका मैक्केनची उपस्थिती संपूर्ण क्षेत्राच्या स्थिरतेसाठी धोकादायक ठरू शकत असल्याचे मत चीनने मांडले आहे. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेसाठी आपण ठामपणे उभे असल्याचे अधोरेखित केले आहे. शिवाय, चीनच्या जबरदस्तीचा आणि हुकूमशाही वृत्तीचा अमेरिका कडाडून विरोध करत असल्याचे अमेरिकेने चीनला सुनावले आहे. 

संबंधित बातम्या