Taliban Rule: 24 तास टॉर्चर, WION रिपोर्टर अनस मलिकच्या टीमवर तालिबान्यांकडून हल्ला

Anas Mallick: अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी रिपोर्टिंग करत असताना WION चे रिपोर्टर अनस मलिक आणि त्यांच्या टीमवर प्राणघातक हल्ला झाला.
Anas Mallick
Anas MallickDainik Gomantak

Taliban assaulted WION reporter Anas Mallick: अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी रिपोर्टिंग करत असताना WION चे रिपोर्टर अनस मलिक आणि त्यांच्या टीमवर प्राणघातक हल्ला झाला. अनससह संपूर्ण टीमला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र, आता अनस मलिक पूर्णपणे सुरक्षित असून त्याने या घटनेबाबत मोठा खुलासा केला आहे. अनस बुधवारी काबूलला पोहोचला होता. त्याच्या एका दिवसानंतर, तो अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला एक वर्ष पूर्ण झाल्याची माहिती देत ​​होता. त्याचवेळी तो अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीच्या हत्येबाबत काबूलमधून अपडेट्सही देत ​​होता.

अनस मलिक आपबिती

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचा दावा अमेरिकेने (America) केला असून, जवाहिरीच्या अफगाणिस्तानातील (Afghanistan) उपस्थितीची माहिती नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. त्याचवेळी तालिबानने अमेरिकेवर आपल्या हद्दीतील हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय नियम मोडल्याचा आरोपही केला आहे. परंतु तालिबानला (Taliban) त्यांचे सत्य जगासमोर येऊ द्यायचे नाही. याच कारणामुळे काबूलमध्ये WION वाहिनीसाठी रिपोर्टिंग करणाऱ्या अनस मलिकचे अपहरण करण्यात आले.

Anas Mallick
Taliban On Al-Zawahiri: जवाहिरीच्या मृत्यूवर तालिबानने अमेरिकेबाबत केले हे वक्तव्य

अनसने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले की, 'आमच्याकडे सर्व आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे होती. आम्ही सर्व महत्त्वाच्या केसेसचे शूटिंगही करत होतो. यादरम्यान आम्हाला अडवून कारमधून बाहेर काढण्यात आले. आमचे मोबाईलही हिसकावून घेणयात आले. काही वेळाने आम्हाला त्या ठिकाणाहून नेण्यात आले आणि अफगाण-तालिबान इंटेलिजन्स युनिटसमोर हजर करण्यात आले.'

Anas Mallick
Taliban: 'अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर करु देणार नाही'

हातकड्या घालण्यात आल्या

अनससह टीममधील सदस्यांना हातकड्या घालण्यात आल्या. तिथे उपस्थित लोकांनी अनसच्या रिपोर्टिंगवर प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यावर विविध आरोपही करण्यात आले. यासोबतच टीममधील सदस्यांना अनेक वैयक्तिक प्रश्नही विचारण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com