Taliban: 'अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर करु देणार नाही'

जगभरातील सरकारे आणि देशातील अफगाण नागरिक आता आश्चर्यचकित आहेत की, तालिबान आपले सरकार अफगाणिस्तानात (Taliban rule in Afghanistan) कसे चालवणार आहे.
Taliban: 'अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर करु देणार नाही'
Amir Khan MuttaqiDainik Gomantak

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावल्यानंतर तालिबान्यांनी अखेर अंतरिम सरकार (Taliban Government) स्थापन केले आहे. यातच आता तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुत्ताकी (Amir Khan Muttaqi) यांनी म्हटले आहे की, ''सरकार दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांवर हल्ला करण्यासाठी करु देणार नाही. तालिबानने एका आठवड्यापूर्वी अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर अमीर खान मुत्तकी यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत हे सांगितले.'' जगभरातील सरकारे आणि देशातील अफगाण नागरिक आता आश्चर्यचकित आहेत की, तालिबान आपले सरकार अफगाणिस्तानात (Taliban rule in Afghanistan) कसे चालवणार आहे.

अमेरिका आणि त्याचे सहयोगी तालिबानवर दबाव टाकत आहेत की, त्यांनी 1990 च्या दशकात अमानुष राजवटीची पुनरावृत्ती कदापी करु नये. त्या काळात तालिबान्यांनी कठोर इस्लामिक कायद्यानुसार राज्य केले होते. तसेच महिला आणि अल्पसंख्याकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागले होते. मुताकीने तालिबान आंतरराष्ट्रीय दबावापुढे कदापी झुकणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकार किती काळ टिकेल हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. याशिवाय अल्पसंख्याक किंवा महिलांना अंतरिम सरकारमध्ये स्थान दिले जाईल की, नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Amir Khan Muttaqi
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

तालिबानने सर्वसमावेशक सरकार स्थापन केलेले नाही

विशेष म्हणजे 1990 च्या दशकात तालिबानने त्यांच्या कारकिर्दीत अल कायदा (Al-Qaida) आणि त्याचा नेता ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) यांना आश्रय दिला होता. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल काबीज केले आणि नंतर गेल्या आठवड्यात अंतरिम सरकारची घोषणा केली. मात्र, तालिबान्यांच्या अफागाणिस्तानमधील अंतरिम सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन टीका होत असून, त्यांच्या सरकारमध्ये केवळ तालिबानी सदस्यांनाच स्थान देण्यात आले आहे. शिवाय, यात ना महिलांचे प्रतिनिधित्व आहे ना अल्पसंख्यांक समाजाचे. तालिबानने म्हटले होते की, ते सर्वसमावेशक सरकार स्थापन करतील.

Amir Khan Muttaqi
UNSC मध्ये अफगाणिस्तान ठरावावर मतदानासाठी चीन, रशियाची अनुपस्थित

अफगाणिस्तानमध्ये निवडणुका घेण्याबाबत हे म्हणाले

मुताकी यांनी म्हटले आहे की, आमचे सरकार अफागाण नागरिकांच्या सेवेबद्दल वचनबद्ध आहे. तसेच दहशतवाद्यांना आपल्या प्रदेशाचा वापर इतरांवर हल्ला करण्यासाठी कधीही करु देणार नाही. निवडणुकीच्या शक्यतेबाबत विचारले असता, मुताकीने अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप करु नये अशी मागणी केली. गेल्या वर्षी अमेरिकेसोबत झालेल्या कराराअंतर्गत तालिबानने अल कायदा आणि इतर दहशतवादी गटांशी संबंध तोडण्याचे व त्यांच्या प्रदेशाचा इतर देशांना कोणताही धोका निर्माण होऊ देणार नाही याची खात्री करण्याचे आश्वासन दिले होते. कराराबद्दल विचारले असता मुत्ताकी म्हणाले, "आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही समूहाला आमची जमीन इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरु देणार नाही."

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com