अफगाणिस्तानात तालिबानचे 100 दिवस पूर्ण, अद्याप सरकारला मान्यता नाहीच !

परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी तालिबान (Taliban) सरकारला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजनैतिक प्रयत्न केले, परंतु ते सर्व अयशस्वी ठरले.
अफगाणिस्तानात तालिबानचे 100 दिवस पूर्ण, अद्याप सरकारला मान्यता नाहीच !
TalibanDainik Gomantak

तालिबानला (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादा देश काबीज करणे सोपे असते, परंतु तो देश चालवणे फार कठीण आहे. तालिबान अजूनही आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी विनंती करत आहे. मंगळवारी, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण केले आहेत (Taliban Afghanistan Crisis). परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी तालिबान सरकारला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजनैतिक प्रयत्न केले, परंतु ते सर्व अयशस्वी ठरले. या सरकारचे नेतृत्व मौलवी हिबतुल्ला अखुंदजादा करत आहेत. जे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमधील सर्वोच्च नेते आहेत.

दरम्यान, तालिबान्यांनी संबंध निर्माण करण्यासाठी आणि देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अनेक प्रादेशिक आणि इतर देशांना भेटी दिल्या आहेत. त्यानंतर किमान सहा देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानला भेट देऊन तालिबानच्या नेतृत्वासोबत बैठका घेतल्या. या 100 दिवसांत अफगाणिस्तानमध्ये सहा महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बैठका झाल्या आहेत (Taliban Afghanistan Current News). अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इराण, पाकिस्तान, भारत, रशिया आणि चीनने बैठका आयोजित केल्या आहेत. याशिवाय जी-20 देशांचे नेते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे.

Taliban
अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत चीनची मोठी भूमिका!

अफगाणिस्तान अजूनही संकटातच

दरम्यान, तालिबानला आशा होती की, जागतिक स्तरावर पार पडलेल्या अनेक बैठकांमध्ये जागतिक मान्यता देण्याबाबत चर्चा होईल, परंतु तसे झाले नाही. अफगाणिस्तानातील सर्वसमावेशक सरकार, मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अफगाण मुली, महिलांसाठी शिक्षण आणि रोजगार, अतिरेकी दहशतवादाच्या विरोधात कोणत्याही तिसऱ्या देशाकडून आपल्या भूमिचा वापर न करणे यासारख्या मुद्यांवर जागतिक स्तरावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. सध्या हा देश वाढती भूक, गुन्हेगारी, रोख रकमेचा अभाव आणि इस्लामिक स्टेट (ISIS-K in Afghanistan) च्या प्राणघातक हल्ल्यांमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

तालिबान काही देशांपुरते मर्यादित

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सल्लागार फखरुद्दीन करिझादा म्हणाले, “या 100 दिवसांमध्ये, इस्लामिक अमिरातीची मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरण काही शेजारी आणि प्रादेशिक देशांपुरते मर्यादित आहे (Taliban Afghanistan Control). तालिबान यापूर्वी दिलेली वचनबद्धता पूर्ण करतो की नाही याची जगभरातील देश वाट पाहत आहेत. स्थानिक टोलो न्यूजनुसार, सध्या इराण, पाकिस्तान, चीन, रशिया, तुर्की, कतार, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, इटलीसह 11 देशासंह संयुक्त अरब अमिरातीने अफगाणिस्तानमध्ये त्यांचे दूतावास उघडले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com