पीएचडी, मास्टर डिग्री आता काहीच कामाची नाही: तालिबानी शिक्षण मंत्री

'आज मुल्ला आणि तालिबान सरकारमध्ये आहेत, मात्र कोणाकडे कोणतीही पदवी नाही, परंतु तरीही आम्ही महान आहोत.
पीएचडी, मास्टर डिग्री आता काहीच कामाची नाही: तालिबानी शिक्षण मंत्री
TalibanDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) 2.0 सरकार स्थापन झाले आहे. तालिबानने कुख्यात दहशतवाद्यांना कॅबिनेट मंत्री बनवले आहे. त्याचबरोबर ते मंत्री बनताच या दहशतवाद्यांनीही आपले हेतू व्यक्त करायला सुरुवात केली आहे. ज्या दहशतवाद्याची अफगाणिस्तानचे नवे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानेही असेच विधान केले आहे. शिक्षण मंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर (Sheikh Maulvi Noorlah Munir) यांनी थेट उच्च शिक्षण आणि पदवी निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. नूरल्ला मुनीर म्हणाले, 'आज मुल्ला आणि तालिबान सरकारमध्ये आहेत. कोणाकडे कोणतीही पदवी नाही, परंतु तरीही आम्ही महान आहोत. अशा परिस्थितीत आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीची गरज नाही.

Taliban
तालिबान सरकारची उद्या घोषणा, कोण होणार पंतप्रधान ?

दरम्यान, आपल्या सरकारची घोषणा करताना तालिबानने लोकांना आश्वासन दिले की, देशात इस्लामिक आणि शरिया कायद्यांतर्गत शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल. आधुनिक शिक्षण आधुनिक शिक्षणावरही भर दिला जाईल. तालिबानने देशातील विद्वानांना कोणत्याही प्रकारे घाबरु नये असे सांगितले आहे. परंतु देशातील अराजकता काही औरच आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com