Kabul: पाकिस्तान विरोधी रॅलीवर तालिबान्यांचा गोळीबार

अहवालानुसार, सुमारे 70 महिला आणि पुरुष पाकिस्तान (Pakistan) दूतावासाबाहेर निदर्शने करत होते.
Taliban
TalibanDainik Gomantak

काबूलमध्ये (Kabul) पाकिस्तानविरोधी (Pakistan) रॅलीमध्ये तालिबान्यांनी (Taliban) गोळीबार केला आहे. अहवालानुसार, सुमारे 70 महिला आणि पुरुष पाकिस्तान दूतावासाबाहेर निदर्शने करत होते. हातात फलक घेऊन हे लोक घोषणा देत होते. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

Taliban
Kabul Airport वर पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची शक्यता- जो बायडेन

मात्र, पाकिस्तानविरोधी आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. वास्तविक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद (Faiz Hameed) यांनी अलीकडेच काबूलला भेट दिली होती. अहवालांनुसार, नवीन सरकारबाबत तालिबान नेत्यांमध्ये मतभेद असताना हमीदची भेट झाली. असे मानले जाते की पाकिस्तानच्या सांगण्यावरुन तालिबानमधील कमी नेत्याला कमान सोपवली जाऊ शकते. या कयासादरम्यान गोळीबाराची ही घटना घडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com